बापाघरी प्रेमाने आणि लाडाने वाढतात पण सासरी स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा लाड करतात.... भाज्यांची नावे ऐकूनच नाही म्हणतात, तिकडे मात्र सगळ्या भाज्या आवडीने खातात.... खरंच मुली कशा असतात ? स्वतःच्या वस्तू संभाळण्यावरून आईचा ओरडा खातात पण सासरी पूर्ण घर - संसार सांभाळतात.... ऑफीस वरून थकून येणारया मुली, लग्नानंतर मात्र ऑफीस आणि घर दोन्ही जमवतात.... खरंच मुली कशा असतात...? जन्मदात्या आई - वडिलांना सोडून, लग्नानंतर अनोळखी लोकांना आपलेसे करतात.... बापाच्या छायेखाली वाढलेल्या, नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालतात.... खरंच मुली कशा असतात...?