नि कीताने फेसबुक चालू केल आणि निखिलने पाठवलेली तिसरी फ्रेंड रिक्वेस्ट तिने डिलीट केली. तिने आज मनाशी निर्णय घेतला आणि निखीलशी जे काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं ठरवलं त्याप्रमाणे तिने निखिलला भेटायला बोलावलं. सकाळपासूनच त्याच्याशी काय बोलायचं ...त्याला काय विचारायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं. निकिताला भेटायला जायचं म्हणून निखिल खुश होता पण निकिताने काही महत्वाचं बोलायचंय असं म्हटल्यावर मात्र निखिलच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याच्या सोबत जे आधी झालं होतं त्यामधून तो कसातरी सावरला होता आणि आता पुन्हा निकिताने असं बोलावलं तेव्हा त्याला परत भीती वाटू लागली. ते दोघेही कॉफी शॉपमधे भेटले. निखिल आधीपासूनच तिथे उभा राहून तिची वाट पहात होता. निकिता आली, थोडी गंभीर दिसत होती ती. निखिलने तिच्याकडे हसून पाहिलं मग तिनेही ओठ ताणून थोडस हसल्यासारखं केलं. निखिलने घाबरत का होईना पण विषयाला हात घातला, “बोला… काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला ?” निकिता, “मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होत..” निखिल तिच्याकडे पहात, “विचारा” निकिता, “म्हणजे….मला भीती वाटतेय” निखिल दचकून एकडे तिकडे बघत, “ कोणाची ?