अ नघा, नंदिनी आणि अर्णव असा तिघांचा छान ग्रुप झालेला. अर्णव पण बोलका असल्यामुळे अनघाही त्याच्याशी बोलु लागली. अर्णवला ऑफिस जॉईन करून 6 महिने झालेले. अनघाचा स्वभाव त्याला आवडू लागला होता, हळूहळू तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात तयार होत होता. अनघा कधी आली नाही की त्याच मन कासावीस होई., कामात नीट लक्ष लागत नसे. नंदिनी प्रमाणे त्यानेही बरंच काही ऐकलं होतं तिच्याबद्दल पण तो लक्ष देत नसे. एकदा तन्वी आजारी पडली आणि अनघा ऑफिसला आली नाही. लंचब्रेक झाला. त्याला नंदिनीला अनघाबद्दल बरच काही विचारायचं होतं आणि आज ती संधी त्याला मिळाली होती. अर्णव : अनघा का नाही आली ग आज ? नंदिनी : तिची मुलगी आजारी आहे रे. अर्णव : ओह.. अर्णव : नंदिनी, आपण दोघेही सगळं सांगतो तिला आपल्या फॅमिलीबदद्दल पण तीची turn आली की मात्र ती नेहमी विषय बदलते. नंदिनी : हो, ती तशीच आहे रे. थोडी वेगळी आहे पण मनाने चांगली आहे. अर्णव : तुला माहितीये नंदिनी ऑफिस मध्ये तिच्याबद्दल काहीही बोललं जातंय...म्हणजे मी त्यावर विश्वास ठेवत नाही पण तरीही खरं काय ते कळायलाच हवं. नंदिनी : अरे, एवढं का tension घेतोस...हे ब