खिडकी भाग १/१.२
तन्वीची समजुत घालुन तिने तिला झोपवलं आणि विचार करता करता तिची झोप कधी लागली कळलंच नाही आणि जाग आली तेव्हा घड्याळात ५.३० वाजलेले. अनघाची धावपळ सुरू झाली. पटापट तोंड धुवून ती कामाला लागली आणि जेवण बनवता बनवताच ती तन्वीला आवाज देऊ लागली.
अनघा, “तन्वी बाळा उठ, लेट झालंय आज...उठ लवकर चल”
तन्वी डोळे चोळत उठली आणि अंघोळीला गेली. अनघाने पटापट सगळं उरकलं आणि तन्वीला तिच्या स्कूलबस मध्ये बसवुन ती तिच्या बस स्टॉपकडे धावत सुटली. बस मध्ये बसली. काल तन्वीने केलेला हट्टाचा विचार आजही तिच्या डोक्यात चालु होता. तन्वी हळू-हळू मोठी होऊ लागली होती. तिला सगळं सांगावच लागणार होत... विचार करतानाच अचानक तिचा स्टॉप आल्याचं तिच्या लक्षात आलं आणि बस चालू होणार तेवढ्यात गडबडीत ती उतरली. ड्रायव्हर तिच्याकडे रागाने बघून, “मॅडम, कुठे जायचं आहे विसरलात का ?, लक्ष कुठे असतं?”
अनघा मात्र चुकी मान्य करून सॉरी बोलून निघाली तिथुन.
लिफ्ट जवळ आली आणि लिफ्ट मात्र निघून गेली… १५ मिनिटे वाट बघितल्यानंतर ती लिफ्ट मध्ये गेली. लिफ्ट ७व्या माळ्यावर पोचली तशी ती ऑफिसमध्ये शिरली. जागेवर जाऊन तिने बॅग बाजूला ठेवली आणि कंम्प्युटर चालु केला , जागेवर बसून डोक्याला हात लावून मोठा श्वास घेतला. बाजूला बसलेली नंदिनी तिच्याकडे पाहत होती.
नंदिनी पाण्याचा ग्लास तिच्याकडे सरकवत, “हे घे पाणी”
अनघाने पाणी पिऊन चेहरा हसरा करत तिच्याकडे बघितलं.
नंदिनी, “काय झालं ? दमलेली का दिसते आहेस आज एवढी?”
अनघा, “अगं, काल गजर लावायला विसरले त्यामुळे उशीर झाला उठायला आणि मग काय नुसतीच धावपळ”
नंदिनी, “अरे देवा. तन्वी ?”
अनघा, “तिला शाळेत सोडून मगच आले.”
असं बोलून अनघा कामाला लागली पण तीच लक्ष लागत नव्हत कामात. नंदिनीं च्या ते लक्षात आलं. तिने बराच प्रयत्न केला तिला विचारायचा पण अनघा ने विषय टाळला.
ऑफिसमध्ये अनघा बद्दल बरच काही कानी पडलं होतं पण नंदिनीला त्या गोष्टींमध्ये काहीच रस नव्हता कारण अनघा बोलायला आणि वागायला खूप चांगली होती आणि त्या दोघी चांगल्या मैत्रिणीं हि झाल्या होत्या. अनघाला ऑफिस मध्ये 3 वर्ष झाली होती आणि नंदिनी नवीनच जॉईन झाली होती. नंदिनी नवीन असताना नेहमी अनघाला पहायची...ती जास्त सगळ्यांशी बोलायची नाही, बोलली तरी मोजकेच, ब्रेकमध्ये कधी- कधी एकटीच खिडकीच्या बाहेर बघत चहा घ्यायची, कामात हुशार होती आणि कामात मदतही करायची. नंदिनी बडबडी असल्यामुळे तिने तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि बघता- बघता दोघींची चांगली मैत्री झाली.
धावत पळत आलेल्या अनघाला ऑफिसमध्ये आल्या-आल्या अनघाला बॉसने केबिन मध्ये बोलावलं. तिने नंदिनीकडे पहात पाण्याचा घोट घेतला आणि घड्याळ पाहिलं. स्वतःशीच विचार करत घाबरत ती केबिन मध्ये गेली आणि येऊन मोठा श्वास घेत जागेवर बसली.
नंदिनी, “ काय ग काय झालं ?”
अनघाला नंदिनीचा tension वाला चेहरा पाहून हसु लागली.
नंदिनी , “ अग हसतेस काय… इथे मला tension आलं. सांग ना पटकन… का बोलावलेलं तुला ?”
अनघा,” अगं शांत हो आधी. एक नवीन मुलगा join होतोय आजपासून त्याला कामाची process शिकवायला सांगितलीये.”
नंदिनी सुटकेचा निश्वास टाकत, “ असं होय…”
अनघा, “ हा. चला आता कामाला लागूया.”
दोघी कामाला लागल्या, थोड्यावेळाने 26-27 वर्षांचा एक मुलगा, नंदिनी आणि अनघाच्या टेबल जवळ येऊन उभा राहून हसत मुखाने, Hi, I am Arnav
दोघी एकसाथ वळून त्याच्याकडे प्रश्नार्तक चेहऱ्याने पाहतात.
अर्णव : actually I am new here, Sir told me to understand work from u...
दोघी जबरदस्तीच्या smile देतात त्याला.
तो chair घेऊन बसतो.
नंदिनी : Hi, मी नंदिनी आणि हि अनघा.
अनघा : आपण कामाला सुरुवात करूया ?
अर्णव : Ok
नंदिनी काम करू लागते आणि अनघा अर्णव ला काम समजावू लागते. अर्णव हि समजून घेत तिला doubts विचारत असतो.
1.30 वाजल्यानंतर मात्र न राहवून नंदिनी अनघा ला बोलते.
नंदिनी : अग, बस कर ना… एकाच दिवसात त्याला किती सांगणारेस. मला भुक लागलीये चल ना जेवूया.
अनघा (घड्याळ बघत) : अग हो, माझं वेळेकडे लक्षच नाही गेलं. चल घेऊया जेवायला….बोलुन मोबाईल घेऊन जाते.
नंदिनी दोघींचे डब्बे घेऊन जाता-जाता अर्णव ला बोलावते जेवायला. अर्णव पण खुश होऊन नंदिनी सोबत जाऊन कँटीनमध्ये बसतो तेवढ्यात अनघा येते.
नंदिनी : काय बोलते तन्वी ? जेवली का ?
अनघा : हो. (अर्णव असल्यामुळे अनघा जास्त बोलत नाही.)
अर्णव : Thank u ..तुम्ही दोघींनी मला सोबत जेवायला बोलावलं.
नंदिनी : welcome.
(नंदिनी पण जबरदस्तीच थोडस हसली.)
नंदिनी आणि अर्णव मात्र गप्पा मारत होते आणि अनघा फक्त हो- नाही एवढीच उत्तर देत होती. अर्णवच्या ते लक्षात आलं.
अर्णव : (अनघा कडे बघत) sorry, जर तुम्हाला आवडलं नसेल मी तुंच्यासोबत जेवायला बसलेलं.
अनघा : अ… नाही, असं काही नाही.
नंदिनी : अरे, don't worry, ती तशीच आहे पटकन नाही बोलती होत.
अर्णव : अच्छा, असं आहे होय.
असंच रोज तिघे एकत्र मिळून जेवू लागले. तिघांचा असा एक चांगला ग्रुप तयार झालेला. काम करता - करता ही मनसोक्त गप्पा मारायचे तिघे. पण...
(क्रमशः)
Next part lawkar post jar
ReplyDeleteChhan surwat ahe.
स्वारस्यपूर्ण कथेसाठी धन्यवाद.असच चालू राहू दे.👍
ReplyDeleteपुढील भाग प्रकाशन वाट पाहत आहे 🙄