भाग १
रेशीमगाठी वधू वर सूचक केंद्र ची फाईल वडिलांनी तिच्या हातात दिली आणि तिच्या पोटात गोळाच आला. आज पर्यंत नुसती चर्चा सुरु होती पण आता आई वडिलांनी लग्न हा विषय चांगलाच मनावर घेतला हे तिच्या लक्षात आलं आणि आपण खरंच लग्न कारण्याएवढं मोठं झालोय का, हा प्रश्न तिला पडला. वडिलांनी दिलेली फाईल घेऊन ती बेडरूम मध्ये गेली आणि त्यात असलेले कागदपत्र बघू लागली, त्यात बऱ्याच मुलांची माहिती होती. त्यातली काही बघितल्या सारखं केलं आणि लगेच मैत्रिणीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. पण ...ती कोण?
ती म्हणजे दिसायला बरी, रंग गोरा, पण उंची मध्ये मात्र मार खाल्ला (असं तिची काकी म्हणायची नेहमी) ती च नाव निकिता. निकिता अभ्यासात सामान्य पण बाकी नृत्य, गायन, खेळ यामध्ये नेहमी पुढे. मनाने साधी, कोणाला त्रास द्यायला आणि कोणि त्रास दिलेला हि आवडायचं नाही. तशीच तिची मैत्रीण सोनल. दोघींचा एकमेकांवर खूप जीव. शाळा , कॉलेज आणि पहिली नोकरी सुद्धा एकत्रच. तिला हे रेशीमगाठी च प्रकरण सांगितलं आणि मग निकिता चा जीव भांड्यात पडला. दोघीमंध्ये बराच वेळ गप्पा झाल्या. निकिता तिला आलेल्या टेन्शन बद्दल सोनल ला सांगत होती, असं कसं एखाद्याचा फक्त फोटो किंवा माहिती बघून त्याच्या सोबत लग्न करायच ? कसा असेल तो? चांगला माणूस असेल तर ठीक नाहीतर... हे आणि असे कितीतरी विचार डोक्यात येत होते. सोनल मात्र स्वतःच्या मनाची घालमेल सांभाळत तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होती, नको टेन्शन घेऊस सगळं नीट होईल, अग तुला माहितीये आज मला कामावरून येताना सरिता भेटलेली.
निकिता,”अग हो, काय बोलली… कशी आहे ती… कॉलेज नंतर 2 वर्षांनी भेटली… काय करते सध्या…?”
सोनल, “अग हो… एकावेळी किती प्रश्न विचारशील. तुझ्यासारखीच मीपण खूप खुश झाली ग तिला बघून…”
निकिता, “ मग…?”
सोनल, “ ती फक्त मी ठीक आहे. एवढंच म्हणाली आणि लेट होतंय सांगून निघून गेली.”
निकिता रागावली, “ काय बोलते...भेटू दे मला कधी, मीपण असच करणार.”
बराच वेळ अशीच चर्चा चालू होती आणि त्यात बरेच विषय हि बदलत गेले, दोन मुली एकमेकांशी बोलत असताना हे साहजिकच आहे. आईने आवाज दिला ,”निकिता...जेवायला ये आणि मग निकिता सोनल शी बोलणं आटपून जेवायला गेली. जेवता जेवता आई आणि वडील एकमेकांकडे असेे बघत होते जणू त्यांना काही बोलायचं होत पण सुरुवात कोणी आणि कशी करायची हेच कळत नव्हतं. शेवटी वडिलांनी पुढाकार घेतलाच. निकीता चे वडील , “ तुला मगाशी फाईल दिलेली पाहिलिस का ?”
निकिता विषय टाळन्याचा प्रयत्न करत, “कुठली ?”
निकीता चे वडील, “ अग मघाशी तुझ्या हातात दिली होती ना , ती रेशीमगाठी …”
निकिता, “ हो, पाहिली आणि कपाटात ठेवली.”
हे संभाषण इथेच संपलं.
पण त्यानंतर मात्र निकिता खूपच वैतागलेली कारण रोज ऑफिस वरून घरी आल की आईच एकच पुराण… अग जरा ते रेशीमगाठी ची साईट तेवढी चालू करून दे, जरा बघूया तरी… आणि नेहमीसारखी निकिता वैतागायची, अग हो, हात पाय धुवून जरा फ्रेश तरी होउदे मला आणि मग ईच्छा नसतानाही तिने आईला चालू करून दिलं आणि मग आईने मुलांची माहिती बघायला सुरुवात केली. निकिताला हि लग्न करायचं होत, पण असं त्याची माहिती बघून किंवा त्याला स्वतःला फक्त बघून आपला जोडीदार ठरवणं तिला पटत नव्हतं आणि महत्वाच म्हणजे तिला जोडीदार समजून घेणारा आणि तिला प्रत्येक गोष्टीत साथ देणारा हवा होता, पण ते हे फोटो बघून कस कळणार, त्याच गोष्टीची तिला भीती वाटत होती. मित्र तिचे तसे बरेच होते पण आधीपासूनच तिने तिच्या मनाशी पक्क केलं होतं, काहीही झालं तरी आपल्याला अरेंज मॅरेज च करायचंय, कारण एकमेकांना पहिल्यांदाच भेटणं त्यानंतर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेणं ते जपण्याचा प्रयत्न करणं यात एक वेगळीच मज्जा आहे असं तिला वाटत असल तरीही, घरी प्रेम विवाह केलेला चालणार नाही हेही तितकच खर होत. असो तिच्या मते मुलाचं गाव किंवा त्याची कमाई आणि इस्टेट जास्त असून संसार सुखी होनार नव्हता त्यामुळे तिने आई - वडिलांना स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही सगळी माहिती काढा… तुम्ही बोलाल ते मला मान्य आहे पण शेवटचा निर्णय मात्र माझाच असेल. आई वडील रोज रेशीमगाठी चालू करून त्यातल्या निवडक मुलांची नोंद एका डायरी मध्ये करून ठेवायचे. आधी आधी वडिलांनी सांगितलं म्हणून निकिता बघायची पण तिला पटत असलेल्या मुलांच गावच फार लांब असायचं नाहीतर ते आडनाव आपल्या पाहुण्यांमध्ये बसतच नाही असे शिक्के मिळायचे. आणि आई वडील ज्यांना कॉल करायचे त्यांना निकीता ची उंची खटकायची नाहीतर आम्हाला उच्च शिक्षित मुलगी हवी जी घर सांभाळू शकेल असे शेरे मिळायचे.
यांना सून नक्की कशाला हवी आहे ? काही जण मुलींना त्यांचा पगार विचारतात, लग्नानंतर नोकरी करावीच लागेल असही बोलतात जस काय त्यांना त्यांच्या मुलावर विश्वासच नाही की तो संसार सांभाळू शकतो. काही जण असे असतात की त्यांना मुलगी चांगली शिकलेली हवी असते पण तिने बाहेर जाऊन काम करायची गरज नाही … माझा मुलगा भरपूर कमावतो, असं बोलतात. पण ही लोक त्या मुलीला का हे ठरवून देत नाहीत की तिने काय करावं ? लग्न झालं म्हणजे सगळी काम तिनेच केली पाहिजेत तेही ऑफिस सांभाळून का असा हट्ट असतो या लोकांचा, काहीजण तर सून येणार याचा अर्थ घरात एक बिनपगारी कामवाली येणार असाच घेतात, एवढं जग पुढे गेल आपण म्हणतो पण तरीही अशा लोकांच्या मनस्थिती का नाही बदलत अजून ? का मुलीच लग्न झालं म्हणजे तीच आयुष्य संपल्यातच जमा होत का? संसारासाठी वजन , उंची आणि रंग एवढा महत्वाचा असतो का ? छान दिसणाऱ्या जोडीचा संसार नेहमी सुखाचा होतो का ? मन आणि माणुसकी याला खरंच काही महत्व नाही ? दोघांची मन जुळणे महत्वाचं नाहीये का ? मनात विचारांचा गोंधळ उडालेला.
आणि विचार करता करता झोप कधी लागली कळलंच नाही...
nice one
ReplyDeleteThnk u 😘
DeleteThnk u 😘
Delete👌👌
ReplyDeleteThank u 😊
DeleteChhan...
ReplyDeleteDhanyawad 😊
DeleteThank u 😊
ReplyDeleteThank u 😊
ReplyDeleteVery nice.
ReplyDeleteThnk u dear 😊
DeleteGood thaught....
ReplyDeleteGood one
ReplyDeleteSahi ahe Keep it on....
ReplyDeleteVery nice and real fact of arrange marriage.
ReplyDeleteVery nice and real fact of arrange marriage.
ReplyDeleteGood start. Mast vahini. ��
ReplyDelete