Skip to main content

रेशीमगाठी...भाग ५

फिस मध्ये गेल्यावर, निकिताला आठवलं कि काल कांदेपोहे चा कार्यक्रम बाहेर चालू असताना आईच्या मोबाईल वर एक कॉल आलेला. एका मुलाचा...निकिता, “ हॅलो, कोण बोलतोय ?”
समोरची व्यक्ती, “ मी निखिल देशमुख बोलतोय...रेशीमगाठी वर प्रोफाइल पाहिली, मला माझा रेशीमगाठी चा नंबर सांगायचा होता. तुम्ही निकिता का ?”
निकिता, “ अ...नाही, मी तिची आई बोलतेय, तुम्ही रेशीमगाठी क्रमांक सांगा आम्ही  माहिती बघून कॉल करू तुम्हाला.” असं बोलून तिने एका कागदावर क्रमांक लिहून घेतला आणि फोन ठेवला. संध्याकाळी घरी गेल्यावर तिने आईला सांगितलं आणि तो कागद शोधू लागली पण तिला तो कागद सापडला नाही. आई मावशीसोबत फोनवर बोलत होती. निकिता हळूच त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती पण काहीच ऐकू येत नव्हतं. आई आणि मावशी एकदा बोलू लागल्या कि यांना कोणीच थांबवू शकत नाही. मावशीला मुली फार आवडायच्या पण तिला दोन्ही मुले असल्यामुळे तिचा निकिता वर खूप जीव होता. दुसऱ्याच दिवशी त्या मावशीच्या ओळखीच्या मुलाकडच्यांनी होकार कळवला. आई खुश झाली, तिने संध्याकाळी वडिलांना सांगितलं पण निकिताला त्या मुलाचा स्वभाव थोडा आवडला नव्हता हे त्या दोघांनाही माहित होत. आईने मावशीला कॉल करून सांगितलं आणि याबद्दल निकीताशी बोलायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे आईने निकीताला बोलावलं आणि मावशीला बोलायचय तुझ्याशी सांगितलं. मावशी बराच वेळ तिला त्या मुलाबद्दल सांगत होती. निकीताने ऐकून घेतलं आणि मग आईकडे फोन देऊन ती बेडरूम मध्ये जाऊन सोनलशी बोलू लागली.
निकिता, “1 प्रॉब्लेम झालाय?”
सोनल घाबरून, “काय ग...काय झालं?”
निकिता, “अग मी तुला म्हटलेली ना तो मुलगा खूपच साधा वाटत होता, काहीच बोलत नव्हता, खूप लाजत होता आणि त्याचा मित्र मला प्रश्न विचारत होता….”
सोनल हसत, “ तोच ना ….मा का लाडला ?”
निकिता हसत, “ अग हो, त्यांनी होकार दिलाय”
सोनल, “पण तुला नाही आवडला ना तो ?”
निकिता, “अग हो पण...घरचे खुश झालेत आणि मावशी पण मलाच समजावत होती...मुलगा चांगला आहे , काही वाईट सवयी नाही, घरचे चांगले आहेत, स्वतःच घर आहे. मला काहीच कळत नाहीये यार”
सोनल, “ हे बघ नीट विचार कर , आयुष्याचा प्रश्न आहे”
निकिता, “हो ग बाई, हे सगळं मला माहित आहे… उगाच अस सारखं बोलून टेन्शन नको वाढवू.”
सोनल, “ शांत हो, मी तुझं टेन्शन नाही वाढवत ग, तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे सांग?”
निकिता, “हेच कि तो मुलगा खूपच शांत आहे आणि माझ्याशी बोलताना तो आईकडे बघत होता आणि मी त्याच्याकडे बघत होती. एवढं काय लाजण्यासारखं होत त्यात...हे मला पटलं नाही. कसा संसार करणार हा ? त्यात माझा स्वभाव त्याच्या विरुद्ध ...पटेल का आमचं ?, तो एकदम शांत आणि मी बडबडी … काहीजण बोलतात विरुद्धच स्वभाव असतील तर पटत आणि काही बोलतात सारखे स्वभाव असतील तर एकमेकांशी चांगलं जुळत ….मला काहीच कळत नाहीये आणि आई - बाबांना ते स्थळ चांगलं वाटतंय, त्यात मावशी पण त्यांच्या बाजूने आहे.”
सोनल, “ हो यार, तुझं ऐकून मला टेन्शन आलं”
निकिता, “ मावशी बोलते, तो मुलगा एवढा पण साधा नाही आणि ती बोललीये त्याच्यासोबत आणि ती बोलत होती तो खूप बोलतो.”
बराच वेळ चर्चा चालू होती दोघींची आणि मग आईने निकिताला आवाज दिला. आज जेवताना घरात एकदम शांतता होती. आईने हळूच बाबांना इशारा केल्यावर बाबांनी बोलायला सुरुवात केली, “ मी त्यांच्या घरी जाऊन येतो एकदा रविवारी, मग पुढचं पुढं बघू …”
निकिताने ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं.
जेवून झाल्यावर आईला कोणाचा तरी फोन आला आणि मग ती निकिताला विचारू लागली, “ कोणीतरी निखिल देशमुख होता… माहिती पाहिली का विचारत होता, मी म्हटलं नंबर दया, आम्ही बघून कळवतो.”
निकिता, “ अरे यार…. काय ग आई, मी बोललेली ना, त्या दिवशी फोन आलेला पण लिहून ठेवलेला नंबरच हरवला”
आई, “हा घे नंबर. बघुया बर … रेशीमगाठी चालू करून”
निकिताने चालू करून दिल आणि शेजारी निघून गेली.
आई-बाबांनी बघितलं मुलगा छान होता. चांगल्या कंपनीत कामाला होता पण त्यांच्या संबंधांमध्ये बसत नव्हते. निकिता आली तेव्हा आई-बाबांची चर्चा चालू होती.
बाबा निकीताकडे बघत, “ तुला काय वाटत ? तुला त्या मुलाचा स्वभाव नाही आवडला, माहितीये आम्हाला पण माणस चांगली आहेत, स्वतःच घर आहे आणि मुलगा निर्व्यसनी आहे ...तु विचार कर, आपल्याला काही गडबड नाही.”
निकिताच्या पोटात गोळा आला, तीने मान डोलावली आणि ती बेडरूम मध्ये गेली. आई-बाबा बोलत आहेत… तेही बरोबर आहे. मुलगा तसा चांगला आहे, घरचे चांगले आहेत,....पण जो मुलगा माझ्याशी काहीच बोलला नाही, त्याला बोलावंसं वाटलं पण नाही, ज्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास नाही, उद्या मला जर काही झालं, मला गरज असेल तेव्हा तो माझ्यापाठिशी तेवढ्या खंबीरपणे उभा राहील का ?, मला आत्मविश्वासाने साथ देईल का ?
2 दिवस डोक्यात तेच विचार चालू होते. आई रोज निकिताशी बोलण्याचा प्रयत्न करायची त्याबद्दल पण निकिता दुर्लक्ष करत होती. शेवटी तिने आईला सांगितलं मला तो मुलगा पसंत नाही, मला नाही वाटत आमचं जमेल आणि पुन्हा मला त्याच्याविषयी काहीही ऐकायचं नाही.
आई, “ठीक आहे, उद्या तो… तू नंबर हरवलेलास ना ते लोक येणार आहेत बघायला आणि हो तु पण एकदा बघून घे रेशीमगाठी वर त्याची माहिती.”
निकिता, “ हो”
निकिता बेडरूम मध्ये जाते तेवढ्यात सोनल चा फोन येतो आणि दोघींच्या गप्पा सुरु होतात.
सोनल, “ अग ऐक ना…. आज च्या कार्यक्रमाची गोष्ट सांगायला कॉल केलाय”
निकिता हसत, “ १०० वर्ष आयुष्य, मी आता तुला त्याचसाठी फोन करणार होते… बोल ना, काय झालं ?”
सोनल, “ मुलगा तसा ठीक होता , पण अग…. आम्हाला दोघांना आत जाऊन बोलायला सांगितलं, आम्ही गेलो, तर तो मला माझी सॅलरी विचारायला लागला आणि बोलतो मी कर्ज घेतलय तर ते आपण दोघे मिळून फेडू म्हणजे लवकर फिटेल. तू मला देत जा तुझी सगळी सॅलरी.”
निकिता दचकून, “ अरे बापरे...झोलर च होता तो, मग तू काय बोललीस ?”
सोनल, “ अग, काय बोलणार ? त्याच्याकडे पाहिलं आणि मान डोलावली. जबरदस्ती आहे का ?, याच्या जीवावर मी जाणार यांच्याकडे आणि हा मला नीट सांभाळूपण नाही शकत, माझी सगळी सॅलरी मी याला का देऊ ? माझ्या आई-वडिलांनी सुद्धा अजून कधी मागितली नाही.”
निकिता, “हो ना, काय पण एक-एक ध्यान असतात ना”
सोनल, “ते गेल्यावर मी सांगितलं आई-बाबांना… त्यांना वाटलं आधी मी मस्करी करतेय. नंतर खरंच सांगितलं तर बोलले सोडून दे याचा विचार पण. मग मी सोडून दिला विचार . बर, तुझं काय झालं ?”
निकिता, “ मीपण नाही सांगितलं आईला आणि हे पण सांगितलं कि परत त्याचा विषय काढू नकोस.”
सोनल, “ चला, म्हणजे वाचलो दोघीपण”.
निकिता, “हो ना आणि आता पुढच्या महिन्यात पित्रुपक्ष चालू होईल मग, महिनाभर का होईना, हे सगळं शांत होईल.”
दोघींनी सुटकेचा निश्वास सोडला आणि विषय बदलला.


Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा