Skip to main content

धागे - दोरे ( भाग ४)


राणे ५ मिनिटात परत येतात, ' साहेब, ती येते म्हटली ३० मिनिटात. '

' छान. बरं, राणे, तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेलात तेव्हा काय - काय माहिती कळाली.'

' साहेब, त्या दिवशी त्यांच्या ऑफीस ची पिकनिक म्हणून हे सगळेच फार्महाऊस वर गेलेले. सगळे मिळून १८ जण होते. मी त्या बंगल्याच्या केअरटेकरशी बोललो, रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी चालू होती. समर त्या कंपनीत आधी काम करायचा आणि तिथेच असताना त्याचं आणि रुबीच प्रेमप्रकरण सुरु झालं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब हा बंगला खून झालेल्या बंगल्याच्या जवळच आहे.’

' राणे, त्या दिवशी त्या पार्टीमध्ये कोण-कोण होत त्यांची लिस्ट बनवा आणि प्रत्येकाची चौकशी करा. मला जाणून घ्यायचय त्या दिवशी पार्टीमध्ये काही वेगळं घडलं का?, ती पार्टी कोणी अरेंज केली ? आणि ती जागा कोणी डिसाईड केली ? उद्याच सगळ्यांना इथे बोलावुन घ्या आणि प्रत्येकाची चौकशी करा. '

‘ ठीक आहे साहेब.'

थोड्याच वेळात रुबी आली. आकर्षक राहनिमाण, लाईट असा मेकअप, मोहक असे डोळे... पहिल्यांदाच असं कोणीतरी पोलीस ठाण्यात आली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं.

हवालदाराकडे चौकशी करून ती इ.जाधव च्या केबीनकडे वळली.  दार उघडच होत, तिने दारावर ठकठक केलं. 

'मी आत येऊ शकते का साहेब ?'

' हो. या ना. आपण कोण?'

' मी रुबी. मला तुम्ही बोलावलंय असं कळलं.'

' हो. या बसा. तुम्ही समरला ओळखता? '

थोडा विचार करून ती म्हटली, ' कोण समर? समर नावाच्या कोणत्याच व्यक्तीला मी ओळखत नाही.'

' मिस रुबी तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता? '

' संगम एन्टरप्रायझेस ' 

' नशीब हे तरी आठवत आहे तुम्हाला. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या सोबत आयटी डिपार्टमेंट मध्ये समर लोखंडे नावाचा व्यक्ती कामाला होता. आठवत आहे का काही? '

स्वतःच्या तोंडाचा घाम पुसत रुबीने होकार दिला. 

' तर, मिस रुबी तुम्हाला कळलं असेलच समरचा खून झालाय आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलावलंय. '

' काय?.. कधी..? ' रुबीच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागले होते. 

' काय ? तुम्हाला हि गोष्ट अजून माहित नव्हती? 

' नाही ' 

' जे झालं ते फार वाईट झालं पण खुन्याचा शोध लावणं फार गरजेचं आहे. ' 

' हो. बरोबर आहे. '

' १३ ऑगस्ट ला रात्री त्याचा खून झाला '

रुबी ऐकून थोडीशी घाबरते. तिच्या चेहऱ्यावरचा घाम ती पुसते. 

' तुम्हाला पाणी हवय का? '

' नाही नको '

' ठीक आहे रुबी, मला समर बद्दल सगळं काही जाणून घ्यायचय. '

' का? तुम्हाला त्याच्या बायकोने काही सांगितलं नाही का ? '

‘ हे बघा आम्हाला तुमच्या दोघांबद्दल सगळं माहित आहे आणि त्याच्या बायकोशी आम्ही बोललोय पण लग्नाआधी तुम्ही त्याला चांगलं ओळखत होता, त्यामुळे ऑफिसमध्ये कोणाशी त्याच भांडण किंवा दुश्मनी ...? '

' नाही. त्याचा स्वभाव शांत होता. सगळ्यांना मदत करायचा, फार कमी चिडायचा तो. ऑफिसमध्ये कोणाशी भांडण नव्हतं त्याच. ' 

' आता तुमच्या दोघांबद्दल सांगा. '

' तुम्ही म्हणालात तुम्हाला माहित आहे सगळं. '

' हो. माहित आहे पण तुमच्या तोंडून ऐकायच आहे. '

' आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. मी ख्रिश्चन आहे आणि समरच्या घरच्यांना मराठी मुलगीच हवी होती. समर ला आई-वडिलांना विरोध करायचा नव्हता त्यामुळे आम्ही वेगळे झालो. त्यानंतर त्याला दुसरीकडे जॉब पण मिळाला. ' 

' पुढे...'

' पुढे त्याच लग्न झालं ...'

' मग...'

' मग मला कसं माहित असणार ....? '

' म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांच्या संपर्कात नव्हता? '

' नाही '

' पण तुमच्या फोन डिटेल्स काही वेगळच सांगत आहेत. '

' काय ? '

' हेच कि तुम्हा दोघांच्या फार गप्पा चालायच्या...'

' नाही..'

' हे बघा रुबी, तुम्ही नाही म्हटलात तरी आमच्याकडे त्याचा पुरावा आहे...' इ.जाधवचा आवाज हळूहळू चढत चाललेला. 

' खोट बोलत आहात तुम्ही ...'

' आम्ही तुम्हाला दाखवू शकतो ...'

' तुम्ही नाही दाखवू शकत...'

' का नाही दाखवू शकत? '

‘ कारण तो नंबर माझ्या नावावर नाहीये....'

ती घाबरते कारण रागाच्या भरात ती खरं बोललेली असते. 

तिला घाम फुटलेला असतो. इ.जाधव समरला आलेल्या शेवटच्या नंबरवर कॉल करतात आणि रुबीच्या मोबाईलची रिंग वाजते.

' म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरून सिम घेतलं होतं '

घाबरलेली रुबी फोन उचलते आणि तिच्या लक्षात येतं की तो फोन इ.जाधव नेच केलेला आहे. 

‘ आम्हाला कधीतरी फोनवर बोलता याव म्हणून मी हा नंबर घेतलेला पण आम्हाला आता बोलताच येणार नाही. ’

' तुम्ही त्या रात्री समरला का फोन केलेला? '

भीतीने रुबीचे हात-पाय थंड पडले होते. 

' मी..मी त्याला फोन नव्हता केला...'

' तुम्ही खोट बोलू नका मिस रुबी, आमच्याकडे डिटेल्स आहेत.'

' पण मी त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला फोन केलेला आणि तेपण त्याच्या सांगण्यावरून...'

' हो. हे खरंय. '

' पण तुम्ही त्याचा खून का केलात मिस रुबी? '

' मी त्याचा खून केला नाही... '

' प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो...'

' मी खरंच त्याचा खून केला नाही ' ती रडू लागते.

' आम्ही कसा विश्वास ठेवू? '

' त्या दिवशी काय घडलं मी सगळं सांगते तुम्हाला...'

' त्या दिवशी आमची ऑफिस पार्टी होती मीपण गेले होते तिथे. अचानक मला समरचा कॉल आला. त्याने मला सांगितलं कि तो तिथेच बाजूच्या बंगल्यात आहे आणि त्याला मला भेटायचंय आधी मी खूप खुश झाली आणि त्याला भेटायला तयार झाली. पण नंतर मला ते चुकीचं वाटलं, मी त्याला पुन्हा कॉल केला आणि सांगितलं कि मी त्याला भेटू शकत नाही. पण त्याने मला खूप समजावल्यावर मी ठीक आहे म्हटले. त्याने मला रात्री १२.३० ला भेटायला सांगितल त्याच्या बंगल्याजवळ, जेव्हा त्याची बायको झोपली असेल. मग आम्ही भेटलो आणि १५ मिनिटं आम्ही एकमेकांशी बोललो नंतर मग मी पुन्हा पार्टीत गेले….पुन्हा आमचं काहीच बोलणं झालं नाही. '

' नक्की या व्यतिरिक्त अजून काही नाही झालं ? '

' नाही '

' तुमच्या सोबत आणखी कोणी होतं का? '

' नाही. '

इ.जाधव, ' राणे, एव्हिडन्स नंबर ६ घेऊन या. '

रुबी चांगलीच घाबरलेली असते. तिला आता समरला भेटायला गेल्याबद्दल फारच पश्चाताप होत असतो.

राणे, ' हे घ्या साहेब '

' मॅडम, हे नीट बघा आणि सांगा कि हे तुमचंच कानातलं आहे का? '

रुबी ते बघता क्षणी ओळखते आणि होकार देते. 

' तुम्हाला हे कुठे सापडलं? '

' समर ज्या बंगल्यात राहत होता तिथे. '

 ' हे त्या दिवशी पार्टीत मी घातलं होत आणि नाचताना कुठेतरी पडलं, मी शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडलं. '

' रुबी, सगळे पुरावे तुमच्याच कडे इशारे करत आहेत. '

' पण साहेब मी खरंच खून केला नाही '

' ते लवकरच कळेल, पण जोपर्यंत हि केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं राहत घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही. '

' ठीक आहे सर '

रुबी तिथून निघून जाते.  इ.जाधव बाहेर जातात. बाहेर पार्टीत आलेल्या सगळ्या जणांची चौकशी चालू होती. जवळ-जवळ सगळ्यांची चौकशी होत आली होती. 

इ.जाधव सगळ्यांसाठी चहा मागवतात. थोड्याच वेळात सगळे मोकळे होतात तोपर्यंत चहा पण आलेलाच असतो. 

इ.जाधवच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाने पार्टीत गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही प्रश्न विचारलेले आणि त्यानुसार त्यांची काही उत्तरे लिहून घेतली होती. 

त्यांनी त्या सगळ्या डिटेल्स गोळा केल्या आणि केबिनमध्ये निघून गेले. त्यांनी एक पेपर घेतला आणि त्यात ते काहीतरी लिहीत होते. 

तेवढ्यात राणे आणि कदम दोघेही इ.जाधवच्या केबिनमध्ये येतात आणि रुबी बद्दल विचारतात ते त्यांना रुबीने सांगितलेलं सगळं सांगतात.  

कदम, ' साहेब तुम्ही जे काही सांगितलं त्यावरून तरी मला ती रुबीचं खूनी वाटतेय. ती समरवर फार प्रेम करत होती पण तो साला, एवढा फट्टू निघाला कि त्याने आई-बापाच्या भीतीने लग्नचं नाही केलं तिच्याशी. म्हणून रागाच्या भरात हिने त्याचा खून केला असेल. '

राणे, ' हा. होऊ शकत. ती पार्टी संपल्यावर येऊन त्याचा खून करून गेली. '


क्रमशः

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा