Skip to main content

धागे - दोरे (भाग ५)




राणे, ' होऊ शकत. ती पार्टी संपल्यावर येऊन त्याचा खून करून गेली. '

इ.जाधव , 'पण जर तिने खून केला असता तर ती त्याला भेटायला गेली, हे तिने का सांगितलं असत? 

राणे आणि कदम, ' बरोबर ' 

राणे, ' मला तर त्याची बायको मीरा वर शंका आहे. ‘

कदम, ' या राणेचं तर आपलं काहीतरी वेगळच असत. तिचा बिचारीचा काय संबंध? '

राणे, ' अहो कदम, हि असली लफडी काही लपून राहत नाहीत. '

कदम, ' ते बरोबर आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ असा होत नाही कि ती कोणालाच दिसत नाही '

राणे, ' हा. पण इथे बोका आहे ना...'

कदम, ' राणे, इथे एका माणसाचा जीव गेलाय आणि जोक कसले करताय? टॉपिक वर या '

राणे एक छोटी उडी मारतात, ' हे घ्या आलो टॉपिक वर '

यावर तिघे हि थोडं हसतात. 

इ.जाधव, ' टाईमपास बस झाला आता. तर राणे तुम्हाला त्या मिरावर का शंका आहे? '

राणे, ' साहेब, त्या दिवशी मी एक पिक्चर बघितला त्यात ती बाई असच करते. '

कदम, ' राणे, हा पिक्चर नाहीये. '

राणे, ' माहितीये मला कदम, पण या पिक्चर वरूनच आजकालची पिढी सगळं शिकतीये. '

इ.जाधव, ' बरोबर बोललात राणे. पुढे सांगा. '

राणे, ' साहेब, मला वाटत मीराला माहित असणार याच लफडं. त्या दिवशी तिने या दोघांना भेटताना पाहिलं असणार. कोणत्याही बाईला आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईबरोबर अफेअर चालू आहे हे कळल्यावर राग येणारच. आणि जशी कि सगळ्या बायकांना सवय असते तशी तिने त्यांचे काही मेसेजेस वाचले असणार आणि रागाच्या भरात तिनेच समरला मारलं आणि नंतर बाकीची सगळी गोष्ट बनवून सांगितली असणार. '

इ.जाधव, ' बरोबर हे हि होऊ शकत. खूप चांगला पॉईंट आहे हा. '

कदम आणि राणे काहीतरी चर्चा करत होते आणि इ. जाधवच्या अचानक काहीतरी डोक्यात आलं. त्यांनी एक कॉल केला आणि १५-२० मिनिटे ते त्याच्याशी काहीतरी बोलत होते अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. त्यांनी तो फोन कट केला.

' राणे, कदम लवकर गाडी काढा. आपल्याला निघावं लागेल. '

' साहेब, तुमच्याकडे बघून वाटतंय कि खुनी आता लगेच आपल्या ताब्यात येणार आहे. '

' हो. राणे. चला लवकर. '

इ.जाधव, राणे आणि कदम ना घेऊन निघतात. 

संध्याकाळची वेळ. एका ५ मजली इमारतीजवळ येऊन गाडी थांबते. इ.जाधव बेल वाजवतात. 

२६ वर्षांचा एक मुलगा दरवाजा उघडतो. समोर पोलीस पाहताच तो पळून जायचा प्रयत्न करतो. इ.जाधव त्याच्या मागे जातात पण कदम त्यांच्या हातातली काठी फेकून मारतात आणि तो जोरात ओरडून तिथेच पडतो.

राणे आणि कदम त्याला पकडून गाडीत बसवतात आणि ते तिथून निघतात. 

पोलीस स्टेशनमध्ये मीरा आणि रुबीला आधीच इ.जाधवने बोलावून घेतलेलं असतं . 

त्याला एका खुर्चीवर बसवलेलं असत. 

तिकडून या दोघीही आत येतात. 

रुबी, 'सुहास तु ? तु का खून केलास समरचा ? '

सुहास, ' तुझ्याचमुळे? '

रुबी, 'माझ्यामुळे? मी काय केलं? '

सुहास, ' हे सगळं तुझ्याचमुळे झालाय...'

इ.जाधव, ' हे तिच्यामुळे नाही तुझ्यामुळे झालं. तुझ्या गडबडीमुळे '

इ.जाधव, ' रुबी, तुम्ही मला आधी सांगा की , तुम्ही तो दुसऱ्याच्या नावावर का नंबर घेतला? '

रुबी, ' सर त्याने जॉब सोडल्यावर आम्ही दोघे नव्हतो बोलत एकमेकांशी पण अचानक 2 आठवड्याआधी तो मला भेटला स्टेशनवर आणि आम्ही खूप वेळ बोललो त्यातून आम्हाला दोघांना कळलं कि आम्ही अजूनही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतो त्यानेच मला सिम घ्यायची आयडिया दिली. मग आम्ही एकमेकांशी फोनवर बोलायचो. त्याला ऑफिस पार्टीचं कळलं तेव्हा त्याने तिथेच जवळ बंगला पाहिला सुट्टीसाठी म्हणजे आम्हाला भेटता येईल. पण हे सगळं कळलं तेव्हा मी घाबरले कि तुम्ही मलाच पकडाल म्हणून मी काही नाही सांगितलं. ’

सुहास, ' पण तुमचं पूर्ण लक्ष तिच्याकडे होतं मग तुम्हाला कळाल कसं ? '

कदम, ' हा साहेब, हा तर आपल्या लिस्टमध्ये पण नव्हता. मग तुम्हाला कस कळलं? ‘

इ.जाधव, ' आपण आज सगळ्यांना बोलवलं तेव्हा सगळ्यांना काही प्रश्न विचारले त्यात बऱ्याच जणांनी सांगितलं कि एकदा रुबी बाहेर गेली आणि त्यानंतर तिच्या मागे हा सुहास पण गेला होता म्हणजे नक्कीच त्याने या दोघांना भेटताना पाहिलं. पण याला जेव्हा विचारलं तेव्हा याने बाहेर गेलेलं सांगितलं नाही. त्यानंतर बऱ्याच जणांनी हा रुबीवर लाईन मारतो हेही सांगितलं. जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा राणेंनी मोबाईलचा विषय काढला तेव्हा माझ्या डोक्यात आलं कि जर यातलं कोणी खून केला असेल तर नक्कीच आज समरचा मोबाईल चेक करेल म्हणून मी लगेच मोबाईल कंपनीत कॉल करून  मोबाईल ट्रेस करायला सांगितलं आणि नशिबाने बरोबर त्याचवेळेस याने तो मोबाईल चालू केला होता. मोबाईल ट्रेस झाला आणि हा पकडला गेला. सुहास मला तुझ्या तोंडून सगळं ऐकायचय... ‘

राणे, ' अरे ए, ऐकायला नाही आलं का तुला, बोल लवकर नाहीतर थोबाड फोडींन ...'

सुहास, ' सांगतो सांगतो, मी जॉईन झालो त्याच्या एक वर्षाने समरने जॉब सोडला. मला माहित होत समर आणि रुबीच्या अफेअर बद्द्ल पण त्याच दुसरीकडे लग्न पण जमलेलं  कळलं होत. मला रुबी आवडायची पण हि मला दुर्लक्ष करायची. बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण हिने भावचं नाही दिला. समर सोडून गेलेला पण तरी हिला तोच आवडायचा. मी हिला जमेल तेवढी मदत करायचो कामात. जेव्हा ऑफिस पार्टी होती तेव्हा आम्ही सगळे एन्जॉय करत होतो आणि मधेच हिला कोणाचा तरी कॉल आला, आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मी तिच्यामागे जाऊन ऐकायचा प्रयत्न केला. तेव्हा तो समर आहे हे मला कळालं, मला फार राग आला. सगळे जण दारू पिण्यात आणि नाचण्यात मग्न होते. १२.१५ ला हि कुठेतरी बाहेर जात होती म्हणून मीपण तिच्यामागे जायला निघालो तेव्हा ती त्यालाच भेटली. मग मला फारच राग आला. तो समर साला, लग्न झाला तरी सुधारला नाही. बायको असताना त्याला काय गरज होती रुबीशी बोलायची आणि भेटायची. माझ्या तर डोक्यातच गेला होता तो. मी ठरवलं याला काय आता मी सोडणार नाही. रुबी परत आल्यावर तिचा मूड खराब होता. मी तिच्याबरोबर नाचण्याचा प्रयत्न केला पण ती घरी जाण्यासाठी म्हणाली. रुबीच नाचताना पडलेलं कानातलं हळूच उचलून मी माझ्या खिशात ठेवलं. आमच्या २-३ ऑफिसच्या लोकांसोबत ती तिथून निघून गेली. मी मात्र तिथेच थांबलो. पहिल्यांदाच एवढी दारू प्यायलो होतो.

मी १.३० वाजता तिथून निघालो, त्याच्या बंगल्याजवळ आलो. गेट बंद होता पण मी गेटवर चढून आत गेलो. आजूबाजूला झाडं असल्यामुळे वर चढायला मदत झाली. खिडकी उघडीच होती. वर चढून खिडकीतून पाहिलं तर, ते दोघेही झोपलेले. थोडावेळ वाट बघितली. २ वाजता त्याची बायको उठून गेली. मी लगेच आत गेलो आणि झोपेतच त्याचा गळा ब्लेडने चिरला. त्याने तडफडत माझ्यासमोर जीव सोडला. मी घाबरलो. जवळच्या टेबलवर समरचा फोन होता तो उचलला,मला रुबी आणि समरच काय-काय बोलणं झालेलं ते पाहायचं होत आणि खिडकीतून बाहेर पडलो. मी खूप घाबरलेलो आणि तेव्हाच माझ्या खिशातून कानातलं तिथे पडलं पण ते शोधत बसायला माझ्याकडे वेळ नव्हता. '

हे सगळं ऐकून मीराला मात्र तिचे अश्रू आवरत नव्हते. इ.जाधव ने इशारा केल्यावर सावंतबाई तिला धीर देऊ लागल्या. आता सगळं काही समोर आलं होतं. 

इ.जाधव,' राणे याला खुनाच्या आरोपाखाली कस्टडीत घ्या. '

सुहासवर न्यायालयात केस चालू होते आणि खुनाचा आरोपी म्हणून तो सिद्ध होतो. इ.जाधव ती फाईल बंद करतात. 

इ.जाधव, 'राणे, चला दुसरी फाईल आणा आणि पुढच्या कामाला लागा. '

राणे नवीन फाईल आणून टेबलवर ठेवतात आणि सगळे पुढच्या केस च्या तयारीला लागतात. 


-----------------समाप्त-----------------

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा