Skip to main content

Posts

धागे - दोरे ( भाग ४)

राणे ५ मिनिटात परत येतात, ' साहेब, ती येते म्हटली ३० मिनिटात. ' ' छान. बरं, राणे, तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेलात तेव्हा काय - काय माहिती कळाली.' ' साहेब, त्या दिवशी त्यांच्या ऑफीस ची पिकनिक म्हणून हे सगळेच फार्महाऊस वर गेलेले. सगळे मिळून १८ जण होते. मी त्या बंगल्याच्या केअरटेकरशी बोललो, रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी चालू होती. समर त्या कंपनीत आधी काम करायचा आणि तिथेच असताना त्याचं आणि रुबीच प्रेमप्रकरण सुरु झालं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब हा बंगला खून झालेल्या बंगल्याच्या जवळच आहे.’ ' राणे, त्या दिवशी त्या पार्टीमध्ये कोण-कोण होत त्यांची लिस्ट बनवा आणि प्रत्येकाची चौकशी करा. मला जाणून घ्यायचय त्या दिवशी पार्टीमध्ये काही वेगळं घडलं का?, ती पार्टी कोणी अरेंज केली ? आणि ती जागा कोणी डिसाईड केली ? उद्याच सगळ्यांना इथे बोलावुन घ्या आणि प्रत्येकाची चौकशी करा. ' ‘ ठीक आहे साहेब.' थोड्याच वेळात रुबी आली. आकर्षक राहनिमाण, लाईट असा मेकअप, मोहक असे डोळे... पहिल्यांदाच असं कोणीतरी पोलीस ठाण्यात आली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. ह...

धागे - दोरे (भाग ३)

पांडुरंग ने सांगितल्याप्रमाणे इ.जाधव ची मदत केली आणि त्यांनी ड्रग्स विकणाऱ्याला एक जाळं बनवून पकडलं. पण अजूनही समर मर्डर केस सॉल्व्ह झाली नव्हती.  विचार करत असताना अचानक इ.जाधवला ती चमकणारी वस्तू आठवते जी त्यांना गेटजवळ सापडते. ते लगेच राणेला आवाज देतात.  'बोला साहेब' 'मी तुम्हाला एव्हिडन्स बॅगमध्ये टाकून एक वस्तू दिली होती जी मला त्या बंगल्याजवळ सापडली होती. ती घेऊन या. ' 'हो. साहेब.' राणे जाऊन एव्हिडन्स बॅग घेऊन येतात. त्यात एक मोठा डायमंड असलेलं गोल्डचं कानातलं असत.  ते निरखून पाहिल्यानंतर त्यावर एक लोगो दिसतो तो एका मोठ्या ज्वेलर्स चा लोगो असतो. इ.जाधव ते कानातलं घेऊन हवालदाराला देतात.  ' सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये या कानातल्याचा फोटो पाठवा आणि इनामदार ज्वेलर्सच्या सगळ्या शाखांमध्ये जाऊन याची डिटेल्स काढा.’ तेवढयात कदम येतात आणि समरच्या मोबाईल ची कॉल डिटेल्स देतात. ' कदम मोबाईल ट्रॅक झाला का ?' इ.जाधव कॉल डिटेल्स निरखून पाहत ' नाही सर, आम्ही त्याच्या IMEI नंबर वरून पण ट्रॅक करायचा प्रयत्न केला, पण मोबाईल अजून चालूच केला गेला नाही....

धागे - दोरे (भाग २)

इ.जाधव, ‘ राणे, आपण नंतर बोलू. मॅडम साठी चहा सांगा. माफ करा समजू शकतो तुमची परिस्थिती पण चौकशी करणं तेवढंच गरजेचं आहे. मला त्या दिवशी नेमक काय घडल ते सगळं सांगा.’ मीरा ने पाण्याचा एक घोट घेत सांगायला सुरुवात केली, ' आम्ही ठाण्याला राहतो. आमच्या दोघांचे आईवडील गावी असतात. १ वर्ष झाल आमच्या लग्नाला. समर आणि मी, मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहोत. रोजच आपलं तेच रूटीन, लवकर उठा ऑफिस ला जा आणि येऊन घरचं उरका. मला कंटाळा आलेला म्हणून मीच समर ला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मग समर ने मला या गेस्टहाऊस बद्दल सांगितल आणि आम्ही आलो इकडे २ दिवस रहायला. पांडुरंग ने आम्हाला पाणी दिलं. फ्रेश होऊन बसलो गप्पा मारत. मग पांडुरंग ने जेवण आणून दिलं. ते जेवलो आणि मग दमल्यामुळे लवकर झोपलो. रात्री तहान लागली म्हणून उठले. तर पाणी च नव्हतं म्हणून खाली किचन मध्ये जाऊन बॉटल भरून आणली आणि येऊन बघते तर समर रक्ताच्या थारोळ्यात होता. मग माझा आवाज ऐकुन पांडुरंग धावत आला आणि मग तुम्हाला कॉल करून बोलावून घेतल.’ मीरा हळूच डोळ्याच्या कडा पुसत होती. इ.जाधव, ' बरं, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कळवलत का ?...

धागे - दोरे (भाग १)

रात्री २ च्या दरम्यान मीराला तहान लागते म्हणून ती उठते पण बाटलीतलं पाणी संपलेलं होत म्हणून ती बाटली घेऊन किचनमधून भरून घेऊन बेडरूममध्ये येते आणि समोरच दृश्य पाहून जोरात किंचाळते, तिला काय करायचं काहीच कळेना. तिचा नवरा समर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. ती जवळ जाऊन पाहते पण त्याचा श्वास बंद पडलेला असतो. स्वतःला सावरून ती पोलिसांना फोन करून कळवते. थोड्याच वेळात तिथे पोलीस येतात. तिथला केअर टेकर पांडुरंग पण तिथे हजर झालेला असतो. इन्स्पेक्टर जाधव त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तिथे हजर होतात. मीरा एका बाजूला रडत बसलेली असते. इ .जाधव, ‘ (बॉडीकडे वळून निरीक्षण करत) कदम बॉडी ताब्यात घ्या आणि पंचनाम्याला पाठवा. राणे बॉडी च्या आजूबाजूला काही पुरावे मिळत आहेत का बघा. (नंतर मिराकडे वळून) तुम्हीच कॉल केला होता का ?’ मीरा, ‘ हो.’ इ. जाधव, ‘ हे तुमचे कोण ?’ मीरा, ‘ मी मीरा. हा माझा नवरा समर ‘ (तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसत) इ.जाधव, ‘हे बघा तुम्ही स्वतःला सावरा.’ पुढे काही बोलणार तितक्यात, मीरा चक्कर येऊन खाली पडते. इ.जाधव, ‘ सावंत बाई यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा लवकर. मीराला घेऊ...

घे भरारी...

वाईट विचारांना झुगारून, अंधश्रद्धेची मान मुरगळून, तोडून सगळे, मानवी पाश... विसरून सगळ्या, जगाची बंधने... पसरव तुझे पंख, हो मोकळी... स्वच्छंद अशा गगनात, घे भरारी....

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा...

जीवन खुप सुंदर आहे

आज अचानक बातमी आली आणि धक्काच बसला. सुशांत सिंग राजपूत ने आपल्या मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केली. तसे या वर्षी बरेच धक्के आपण सहन केलेत. कितीतरी चांगल्या कलाकारांना गमावलं आपण यावर्षी. त्यातले काहीजण वृध्द होते, काही आजारी आणि काही मानसिकरीत्या आजारी. डिप्रेशन सध्या सगळ्यात मोठा आजार झालंय. होय, कोरोणा पेक्षा ही भयानक आजार. इतर आजारांमध्ये तुम्हाला आजाराची लक्षणं दिसतात, इतर लोक तुमची काळजी घेतात पण डिप्रेशन हा असा आजार आहे की त्यात बऱ्याचवेळा तुम्हालाच कळतं ही नाही, ना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना. खरतर आपल्याकडे या गोष्टीला तेवढस महत्वचं दिलं जात नाही. बरेच जण तर बोलायलाच घाबरतात कारण आपण जर बोललो तर लोक हसतील, नाहीतर आपल्याला थोडंसं सकारात्मक काहीतरी बोलुन ज्ञान द्यायचं काम करतील, यापुढे काही होणार नाही. डिप्रेशन हा सध्याच्या तरुण पिढीत वाढणारा सगळ्यात वाईट आजार झालाय. सोशल मीडियाच्या जगात १००-२०० मित्र असून सुद्धा ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं शेअर करू शकतो, जो आपल्याला समजून घेऊ शकतो असा एकही मित्र आपल्या भेटू नये? का आपण उघडपणे आपल्या भावना कोणासमोर व्यक्त ...