Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

रेशीमगाठी...भाग ३

नि कीताच आज कामात काही लक्ष लागत नव्हतं. आईने सांगितल्याप्रमाणे आज ती ऑफिस मधून लवकर निघाली. ती येण्याआधीच सगळे घरी तयार होऊन बसलेले, नेहमी हाफ पॅण्ट घालणारा तिचा भाऊ आज फुल पॅण्ट घालून...शहाण्या बाळा सारखा नीटनेटका दिसत होता. आई वडील हि बऱ्यापैकी तयार झालेले आणि टीव्ही वर सिरिअल ऐवजी बातम्या लावल्या होत्या (इंप्रेशन पाडण्यासाठी). आईने निकिताला साडी हातात दिली नेसायला आणि पटकन तयार हो सांगितलं. आई तिला मदत करत होती तयार व्हायला, त्या बरोबरच ती निकीताला टिपण्या पण देत होती, तु आतमध्येच बस...मी बोलेन तेव्हाच बाहेर यायचं, बाहेर आल्यावर नॉर्मलीच बस… घाबरू नकोस, जेवढं विचारतील तेवढच बोल…निकिताच टेन्शन वाढत होत पण तिच्या आईचीही तीच अवस्था झालेली. तेवढ्यात निकीताचा भाऊ...नितेश आला, “आई, कॉल आलेला ते लोक येतील 5 मिनिटात” आणि आई सरबत बनवायला गेली. नितेश निकीताकडे बघून हसत म्हणाला, “ जास्त जोरात हसू नकोस ग त्यांच्यासमोर….नाहीतर घाबरतील ते लोक.” निकिता चिडून, “बाळा, तु लहान आहेस अजून, फुल पॅण्ट घातल्याने कोणी मोठं होत नसत” तेवढ्यात आईने किचनमधून आवाज दिला तेव्हा दोघे शांत झाले. वडील शां

रेशीमगाठी… भाग २

नि किता एक सर्व सामान्य घरातली मुलगी. घरात एकूण चार जण.. आई, वडील, छोटा भाऊ आणि निकिता. हे रेशीमगाठी प्रकरण चालु झाल्यापासून ती सतत विचार करायला लागली होती. आजही आई च्या सांगण्यावरून तिने साईट चालू केली आणि मुलांची माहिती डायरी मध्ये नोंद करू लागली. त्यातही आईच चालूच होत ...या मुलाचं आडनाव आपल्या नाते संबंधांमध्ये बसत नाही, या मुलाचं गाव खूपच लांब आहे. 3-4 मुलांचे फोन नंबर तिने आईच्या हातात दिले आणि ती बाजूला झाली आणि शेजारच्या छोट्या निनाद सोबत ती खेळू लागली. आई मात्र त्या नंबर वर कॉल करायचा प्रयत्न करत होती. तिने पहिला नंबर लावला, आई,” हॅलो, मी सुमन पवार बोलते, तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला. तुमची थोडी माहिती हवी होती…” समोरची व्यक्ती ,” आमच्या मुलाचं लग्न झालं “ आई गडबडली, “ बर बर , ठीक आहे” बोलून तिने फोन ठेवला. काही कळतं कि नाही...या लोकांना, लग्न झालं तर त्याच नाव काढून टाकायचं ना रेशीमगाठी मधून...असं पुट-पुटत तिने दुसरा नंबर लावला. आई, “ हॅलो, मी सुमन पवार बोलतेय.. तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला.” समोरची व्यक्ती, “ हो. मी मुलाची आई