सं ध्याकाळ झाली आणि घरात गडबड सुरु झाली. नेहमीप्रमाणे नितेशची फुल पॅण्ट, बाबांचा पेपर आणि बातम्या. पाहुणे आले. निकिता आत मध्ये बसलेली. निकीताचा जासुस बनून नितेश गुपचूप आत आला आणि निकीताला बाहेरची परिस्थिती सांगू लागला. नितेश, “अग ताई, हे लोक पूर्ण खानदान च घेऊन आलेत.” निकिता घाबरून, “काय ? अरे फुकटच खायचं म्हणून एवढ्या लोकांनी यावं का ?” नितेश चहा द्यायला म्हणून परत बाहेर निघून गेला. निकीताला रागच आला त्यांचा. एवढ्या सगळ्यांना चहा, नाश्ता, बिचाऱ्या आईची किती धावपळ होते या सगळ्यात? तेवढ्यात आई आत आली निकीताला बोलवायला आणि निकिता बाहेर जाऊन तिच्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसली. तिने हळूच सगळ्यांकडे पाहिलं तर मुलगा, त्याचा भाऊ, त्याचे आई-वडील आणि काका-काकी आलेले. तिने हळूच मुलाकडे पाहिलं आणि त्याचक्षणी तिच्या लक्षात आलं की तो मुलगाही तिच्याकडेच पाहत होता आणि तिने लगेच नजर खाली केली. त्याच्या आईने ओळख करून दिली सगळ्यांची आणि नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. मुलानेही विचारले काही प्रश्न. नंतर आईने तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर आत जाऊन बोला असं म्हटलं. निकिता आणि तो म