सं ध्याकाळ ची वेळ, आई - बाबा बसून गप्पा मारत आहेत. दोघांच्या हातात मोबाईल. बाबा : अगं, तुला सांगायला विसरलो. त्या पवारांच्या मुलीच लग्न ठरलं. पुढच्या विकेण्डला आपल्याला जाव लागेल लग्नाला. आई : अरे वाह, चांगलं झालं. बाबा : काय चांगल झालं? माझ्या मते तो फारच गडबड करत आहे. आई : कसली गडबड? अरे आपल्या मानसी बरोबर ची आहे ती. दोघींनी इंजिनिअरींग केल सोबत आणि आता 3 वर्ष झाली जॉब करतेय. चांगली सेटल आहे आणि जर मुलगा पण वेल सेटल आणि मनासारखा असेल तर ...चांगलच. ( हातातला मोबाईल बाजूला ठेवत) बरं, मी काय म्हणते... बाबा : नको बोलुस ( मोबाईल कडे बघत) आई : अस काय रे करतोस, ऐकून तरी घे... बाबा : मला माहिती आहे की तु आता काय बोलणार आहेस. यावेळेस कोणी स्थळ सुचवलय ? आई : अरे, त्या जाधव आहेत ना त्यांचा भाचा आहे. वेल सेटल आहे आणि स्वभावाने पण फार चांगला आहे. बाबा : तुला त्याचा स्वभाव कसा माहिती ? आई : अरे, त्या जाधव बाई सांगत होत्या. त्या मला त्याचा फोटो वॉट्सप करणार आहेत. बाबा : अगं, हो हो... कीती घाई. आई: घाई नाही रे, त्यांनी मला सुचवलं म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता पासुन सुरुवात करू तेव्हा