संध्याकाळ ची वेळ, आई - बाबा बसून गप्पा मारत आहेत. दोघांच्या हातात मोबाईल.
बाबा : अगं, तुला सांगायला विसरलो. त्या पवारांच्या मुलीच लग्न ठरलं. पुढच्या विकेण्डला आपल्याला जाव लागेल लग्नाला.
आई : अरे वाह, चांगलं झालं.
बाबा : काय चांगल झालं? माझ्या मते तो फारच गडबड करत आहे.
आई : कसली गडबड? अरे आपल्या मानसी बरोबर ची आहे ती. दोघींनी इंजिनिअरींग केल सोबत आणि आता 3 वर्ष झाली जॉब करतेय. चांगली सेटल आहे आणि जर मुलगा पण वेल सेटल आणि मनासारखा असेल तर ...चांगलच.
( हातातला मोबाईल बाजूला ठेवत)
बरं, मी काय म्हणते...
बाबा : नको बोलुस ( मोबाईल कडे बघत)
आई : अस काय रे करतोस, ऐकून तरी घे...
बाबा : मला माहिती आहे की तु आता काय बोलणार आहेस.
यावेळेस कोणी स्थळ सुचवलय ?
आई : अरे, त्या जाधव आहेत ना त्यांचा भाचा आहे. वेल सेटल आहे आणि स्वभावाने पण फार चांगला आहे.
बाबा : तुला त्याचा स्वभाव कसा माहिती ?
आई : अरे, त्या जाधव बाई सांगत होत्या. त्या मला त्याचा फोटो वॉट्सप करणार आहेत.
बाबा : अगं, हो हो... कीती घाई.
आई: घाई नाही रे, त्यांनी मला सुचवलं म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता पासुन सुरुवात करू तेव्हा कुठे १-२ वर्षात जुळेल.
बाबा : पण त्या आधी आपल्याला तिच्याशी बोलायला हव.
आई : अरे हो रे, मी नाही कुठे म्हणतेय. तीची पसंती लक्षात घेऊनच आपण पुढे जाणार.
(थोडसं थांबून छोटीशी स्माईल करून)
खर, वाटत नाही रे, कीती पटापट दिवस गेले. एवढुशी होती मानसी, कशी दुडूदुडू धावायची. मग शाळा, कॉलेज, जॉब, बघता बघता घराची जबाबदारी घेऊ लागली ती आणि आता लग्नाच वय झालं तिच. खरच वाटत नाही हे सगळं.
बाबा : हो ना, दिवस किती पटापट जातात...
माझी मानसी हुशार आणि स्ट्रॉंग गल आहे.
आई : हो. आहेच ती.
दारावरची बेल वाजते. आई दरवाजा उघडते. मानसी येते.
मानसी (बसतं): काय चाललंय दोघांच ?
(आई पाणी आणून देते.)
बाबा : काही नाही, असचं गप्पा मारत बसलोय. तु सांग, कस झालं तुझ कॉलेजच रियुनियन ?
मानसी : मस्त. खूप मज्जा आली. ३ वर्षांनी आज सगळे भेटले. खुप गमती झाल्या, त्या मला सांगायच्या आहेत पण...
बाबा :पण काय ?
मानसी : मला बाहेर जायचय...
आई : अगं, आत्ताच तर आलीस बाहेरून
मानसी : आई, अग त्या श्वेता चा बर्थडे आहे. मी नव्हती जाणार पण तीने फारच फोर्स केला. म्हणून मी तिला हो म्हटल.
बाबा : ठीक आहे गं, जा तु.
(बाबा आणि मानसी एकमेकांकडे बघतात मग आईकडे बघतात आणि आई पण त्यांच्या कडे बघून हसते.)
मानसी : थ्यँक्यु आई- बाबा.
आई : थोडस खाऊन घे.
मानसी : भरपूर खाल्लय ग. नको मला आता काही. चला मी फ्रेश होते आणि तयारी करते.(उठून आत जाते.)
आई : तु का सगळ ऐकतोस रे हीच ?
बाबा : जाऊ दे ग, करू दे मजा.
आई : अरे हो. मी नाही कुठे म्हणते.. पण ही लेट येते कधी तर काळजी वाटते रे मला.
बाबा : (तिच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवतो) एवढी काळजी नको करुस गं. मी म्हटलं ना मघाशी आपली मुलगी स्ट्राँग आहे. ती कोणत्याही परिस्थितीत लढू शकते.
आई : हो रे...पण
(आईच बोलण मधेच कट करत)
बाबा :(मोबाईल कडे बघत) वाह, ग्रेट इनिशिएटिव. मस्त न्युज आहे.
आई : काय रे ?
बाबा : अग, सरकार ने नवीन कायदा मंजूर केलाय. नाबालिक मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आजीवन कारावासाची शिक्षा मिळणार.
(आई थोडसं हसते आणि मग दुर्लक्ष करते.)
बाबा : एवढी चांगली न्यूज दिली मी आणि त्यावर तुझी एवढीच रिअँक्शन ? जनरली तुझच चाललेल असायच ना, सरकार बलात्कार्यां विरोधात काहीच का करत नाही.
आई : अरे, सरकारने कायदा तर केला पण अर्धवट...
बाबा : म्हणजे ?
आई : या कायद्यामुळे लहान मुलींचे बलात्कार होण्यावर कदाचित आळा बसेलही पण बाकीच्यांच काय ? म्हणजे ज्या मोठ्या मुली आणि स्त्री आहेत त्यांच्यावर बलात्कार झालाच तर यांना काहीच फरक पडत नाही ? त्यांचा जो काही मानसिक आणि शारिरिक छळ होतो...त्याच काय ? ते बलात्कारी काय... तर, काही दिवस जेल ची हवा खाणार आणि पुढचा तुकडा पाडायला सज्ज.
का आपल सरकार इतर देशांप्रमाणे कडक कायदे करु शकत नाही ? निदान शिक्षेच्या भितीने तरी या गोष्टींवर आळा बसेल.
बाबा : (चेहऱ्यावर गंभीर भाव, काळजी आणि विचार) खरय तुझ.
आई : आधी मुलींना पुर्ण शिक्षण द्या म्हणतात, मग जेन्डर इक्वँलिटी, त्यासाठी बरेचसे कार्यक्रम राबवतात, त्यांना जे हव ते करिअर करू द्या म्हणतात मग त्यांच्यावर असे प्रसंग आलेच तर गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा देऊन मुलींना सपोर्ट का करत नाही. आई - वडीलांनी नक्की करायच काय ? मुलगी लहान असो की मोठी, अस काही घडलच तर आई - वडिलांना त्रास तर तेवढाच होतो ना. किती दिवस मुलींच्या कपड्यांच कारण देणार हे लोक...त्यापेक्षा माणसं स्वतःचे विचार आणि बघण्याचा द्रूष्टीकोन का बदलू शकत नाही.
(मानसी आतुन तयार होऊन येते आणि गडबडीत शुज घालत.)
मानसी : आई - बाबा, मी जेवुन येणारे आणि मला यायला लेट होईल...चला येते मी...
(मानसी शूज घालून चालायला जाणार तेवढ्यात ती अडखळते आणि खाली पडते.)
आई - बाबा : (सोबत घाबरून) बाळा, सांभाळून.
मानसी आश्चर्याने दोघांकडे पाहू लागते.
दोघेही हाच विचार करत असतात की आपल्या मुलीबद्दल असा विचार करूनच आपली ही हालत झाली मग ज्यांच्या आयुष्यात हे घडल असेल, त्यांच काय ???
Comments
Post a Comment