Skip to main content

Posts

Showing posts from 2016

रेशीमगाठी...भाग ६

सं ध्याकाळ झाली आणि घरात गडबड सुरु झाली. नेहमीप्रमाणे नितेशची फुल पॅण्ट, बाबांचा पेपर आणि बातम्या. पाहुणे आले. निकिता आत मध्ये बसलेली. निकीताचा जासुस बनून नितेश गुपचूप आत आला आणि निकीताला बाहेरची परिस्थिती सांगू लागला. नितेश, “अग ताई, हे लोक पूर्ण खानदान च घेऊन आलेत.” निकिता घाबरून, “काय ? अरे फुकटच खायचं म्हणून एवढ्या लोकांनी यावं का ?” नितेश चहा द्यायला म्हणून परत बाहेर निघून गेला. निकीताला रागच आला त्यांचा. एवढ्या सगळ्यांना चहा, नाश्ता, बिचाऱ्या आईची किती धावपळ होते या सगळ्यात? तेवढ्यात आई आत आली निकीताला बोलवायला आणि निकिता बाहेर जाऊन तिच्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसली. तिने हळूच सगळ्यांकडे पाहिलं तर मुलगा, त्याचा भाऊ, त्याचे आई-वडील आणि काका-काकी आलेले. तिने हळूच मुलाकडे पाहिलं आणि त्याचक्षणी तिच्या लक्षात आलं की तो मुलगाही तिच्याकडेच पाहत होता आणि तिने लगेच नजर खाली केली. त्याच्या आईने ओळख करून दिली सगळ्यांची आणि नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. मुलानेही विचारले काही प्रश्न. नंतर आईने तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर आत जाऊन बोला असं म्हटलं. निकिता आणि तो म

रेशीमगाठी...भाग ५

ऑ फिस मध्ये गेल्यावर, निकिताला आठवलं कि काल कांदेपोहे चा कार्यक्रम बाहेर चालू असताना आईच्या मोबाईल वर एक कॉल आलेला. एका मुलाचा...निकिता, “ हॅलो, कोण बोलतोय ?” समोरची व्यक्ती, “ मी निखिल देशमुख बोलतोय...रेशीमगाठी वर प्रोफाइल पाहिली, मला माझा रेशीमगाठी चा नंबर सांगायचा होता. तुम्ही निकिता का ?” निकिता, “ अ...नाही, मी तिची आई बोलतेय, तुम्ही रेशीमगाठी क्रमांक सांगा आम्ही  माहिती बघून कॉल करू तुम्हाला.” असं बोलून तिने एका कागदावर क्रमांक लिहून घेतला आणि फोन ठेवला. संध्याकाळी घरी गेल्यावर तिने आईला सांगितलं आणि तो कागद शोधू लागली पण तिला तो कागद सापडला नाही. आई मावशीसोबत फोनवर बोलत होती. निकिता हळूच त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती पण काहीच ऐकू येत नव्हतं. आई आणि मावशी एकदा बोलू लागल्या कि यांना कोणीच थांबवू शकत नाही. मावशीला मुली फार आवडायच्या पण तिला दोन्ही मुले असल्यामुळे तिचा निकिता वर खूप जीव होता. दुसऱ्याच दिवशी त्या मावशीच्या ओळखीच्या मुलाकडच्यांनी होकार कळवला. आई खुश झाली, तिने संध्याकाळी वडिलांना सांगितलं पण निकिताला त्या मुलाचा स्वभाव थोडा आवडला नव्हता हे त्या दोघांनाह

रेशीमगाठी...भाग ४

आ ज रविवार...सगळ्यांचाच आवडता दिवस, पण निकिताचा मूड खराब होता. आज संध्याकाळी, पुन्हा कांदेपोहे चा कार्यक्रम, काल च्या अनुभवामुळे तिला आज एवढी भीती वाटत नसली तरी मनात चलबिचल चालूच होती. तिने रेशीमगाठी चालू केल आणि त्या मुलाची माहिती बघू लागली, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आणि एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर होता. आईने जेवायला बोलावल आणि ती जेवायला गेली. वडील आईकडे बघत, “ काल आलेले त्यांचा काही निरोप ?” आईने नकारार्थी मान हलवली. वडील, “ आज संध्याकाळी येणार आहेत त्यांची माहिती काढली, आपली मंदाकिनी आत्या आहे ना त्यांच्या गावचे आहेत हे. तिने सांगितलं तस कि लोकं चांगली आहेत, पण जमिनीवरून काहीतरी वाद चालू आहेत सांगत होती.” आई, “ बाकी सगळं जाऊदेत पण मानस चांगली भेटणं महत्वाचं. अहो, माझी बहिण सिंधू आहे ना तिचा कॉल आलेला ती सांगत होती, बँकेत आहे मुलगा, वडील पोलीस मध्ये आहेत, 1 बहीण आहे. तिच्याच गावचे आहेत, दादर ला राहतात, ती ओळखते त्यांना.” वडील, “ बरं, मग फोटो आणि बायोडेटा सांग त्यांना पाठवायला, आपलापण पाठवून देऊ.” तिच्या बहिणीने आणलेलं स्थळ असल्यामुळे आई खुश होती आणि तिला खात्रीही

रेशीमगाठी...भाग ३

नि कीताच आज कामात काही लक्ष लागत नव्हतं. आईने सांगितल्याप्रमाणे आज ती ऑफिस मधून लवकर निघाली. ती येण्याआधीच सगळे घरी तयार होऊन बसलेले, नेहमी हाफ पॅण्ट घालणारा तिचा भाऊ आज फुल पॅण्ट घालून...शहाण्या बाळा सारखा नीटनेटका दिसत होता. आई वडील हि बऱ्यापैकी तयार झालेले आणि टीव्ही वर सिरिअल ऐवजी बातम्या लावल्या होत्या (इंप्रेशन पाडण्यासाठी). आईने निकिताला साडी हातात दिली नेसायला आणि पटकन तयार हो सांगितलं. आई तिला मदत करत होती तयार व्हायला, त्या बरोबरच ती निकीताला टिपण्या पण देत होती, तु आतमध्येच बस...मी बोलेन तेव्हाच बाहेर यायचं, बाहेर आल्यावर नॉर्मलीच बस… घाबरू नकोस, जेवढं विचारतील तेवढच बोल…निकिताच टेन्शन वाढत होत पण तिच्या आईचीही तीच अवस्था झालेली. तेवढ्यात निकीताचा भाऊ...नितेश आला, “आई, कॉल आलेला ते लोक येतील 5 मिनिटात” आणि आई सरबत बनवायला गेली. नितेश निकीताकडे बघून हसत म्हणाला, “ जास्त जोरात हसू नकोस ग त्यांच्यासमोर….नाहीतर घाबरतील ते लोक.” निकिता चिडून, “बाळा, तु लहान आहेस अजून, फुल पॅण्ट घातल्याने कोणी मोठं होत नसत” तेवढ्यात आईने किचनमधून आवाज दिला तेव्हा दोघे शांत झाले. वडील शां

रेशीमगाठी… भाग २

नि किता एक सर्व सामान्य घरातली मुलगी. घरात एकूण चार जण.. आई, वडील, छोटा भाऊ आणि निकिता. हे रेशीमगाठी प्रकरण चालु झाल्यापासून ती सतत विचार करायला लागली होती. आजही आई च्या सांगण्यावरून तिने साईट चालू केली आणि मुलांची माहिती डायरी मध्ये नोंद करू लागली. त्यातही आईच चालूच होत ...या मुलाचं आडनाव आपल्या नाते संबंधांमध्ये बसत नाही, या मुलाचं गाव खूपच लांब आहे. 3-4 मुलांचे फोन नंबर तिने आईच्या हातात दिले आणि ती बाजूला झाली आणि शेजारच्या छोट्या निनाद सोबत ती खेळू लागली. आई मात्र त्या नंबर वर कॉल करायचा प्रयत्न करत होती. तिने पहिला नंबर लावला, आई,” हॅलो, मी सुमन पवार बोलते, तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला. तुमची थोडी माहिती हवी होती…” समोरची व्यक्ती ,” आमच्या मुलाचं लग्न झालं “ आई गडबडली, “ बर बर , ठीक आहे” बोलून तिने फोन ठेवला. काही कळतं कि नाही...या लोकांना, लग्न झालं तर त्याच नाव काढून टाकायचं ना रेशीमगाठी मधून...असं पुट-पुटत तिने दुसरा नंबर लावला. आई, “ हॅलो, मी सुमन पवार बोलतेय.. तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला.” समोरची व्यक्ती, “ हो. मी मुलाची आई

रेशीमगाठी... भाग १

भाग १ रे शीमगाठी वधू वर सूचक केंद्र ची फाईल वडिलांनी तिच्या हातात दिली आणि तिच्या पोटात गोळाच आला. आज पर्यंत नुसती चर्चा सुरु होती पण आता आई वडिलांनी लग्न हा विषय चांगलाच मनावर घेतला हे तिच्या लक्षात आलं आणि आपण खरंच लग्न कारण्याएवढं मोठं झालोय का, हा प्रश्न तिला पडला. वडिलांनी दिलेली फाईल घेऊन ती बेडरूम मध्ये गेली आणि त्यात असलेले कागदपत्र बघू लागली, त्यात बऱ्याच मुलांची माहिती होती. त्यातली काही बघितल्या सारखं केलं आणि लगेच मैत्रिणीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. पण ...ती कोण? ती म्हणजे दिसायला बरी, रंग गोरा, पण उंची मध्ये मात्र मार खाल्ला (असं तिची काकी म्हणायची नेहमी) ती च नाव निकिता. निकिता अभ्यासात सामान्य पण बाकी नृत्य, गायन, खेळ यामध्ये नेहमी पुढे. मनाने साधी, कोणाला त्रास द्यायला आणि कोणि त्रास दिलेला हि आवडायचं नाही. तशीच तिची मैत्रीण सोनल. दोघींचा एकमेकांवर खूप जीव. शाळा , कॉलेज आणि पहिली नोकरी सुद्धा एकत्रच. तिला हे रेशीमगाठी च प्रकरण सांगितलं आणि मग निकिता चा जीव भांड्यात पडला. दोघीमंध्ये बराच वेळ गप्पा झाल्या. निकिता तिला आलेल्या टेन्शन बद्दल सोनल ला सांगत होती, अ