Skip to main content

Posts

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!
Recent posts

खरंच मुली कशा असतात ?

बापाघरी प्रेमाने आणि लाडाने वाढतात पण सासरी   स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा लाड करतात.... भाज्यांची नावे ऐकूनच नाही म्हणतात, तिकडे मात्र सगळ्या भाज्या आवडीने खातात.... खरंच मुली कशा असतात ? स्वतःच्या वस्तू संभाळण्यावरून आईचा ओरडा खातात पण सासरी पूर्ण घर - संसार सांभाळतात.... ऑफीस वरून थकून येणारया मुली, लग्नानंतर मात्र ऑफीस आणि घर दोन्ही जमवतात.... खरंच मुली कशा असतात...? जन्मदात्या आई - वडिलांना सोडून, लग्नानंतर अनोळखी लोकांना आपलेसे करतात.... बापाच्या छायेखाली वाढलेल्या, नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालतात.... खरंच मुली कशा असतात...?

धागे - दोरे (भाग ५)

राणे, ' होऊ शकत. ती पार्टी संपल्यावर येऊन त्याचा खून करून गेली. ' इ.जाधव , 'पण जर तिने खून केला असता तर ती त्याला भेटायला गेली, हे तिने का सांगितलं असत?  राणे आणि कदम, ' बरोबर '  राणे, ' मला तर त्याची बायको मीरा वर शंका आहे. ‘ कदम, ' या राणेचं तर आपलं काहीतरी वेगळच असत. तिचा बिचारीचा काय संबंध? ' राणे, ' अहो कदम, हि असली लफडी काही लपून राहत नाहीत. ' कदम, ' ते बरोबर आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ असा होत नाही कि ती कोणालाच दिसत नाही ' राणे, ' हा. पण इथे बोका आहे ना...' कदम, ' राणे, इथे एका माणसाचा जीव गेलाय आणि जोक कसले करताय? टॉपिक वर या ' राणे एक छोटी उडी मारतात, ' हे घ्या आलो टॉपिक वर ' यावर तिघे हि थोडं हसतात.  इ.जाधव, ' टाईमपास बस झाला आता. तर राणे तुम्हाला त्या मिरावर का शंका आहे? ' राणे, ' साहेब, त्या दिवशी मी एक पिक्चर बघितला त्यात ती बाई असच करते. ' कदम, ' राणे, हा पिक्चर नाहीये. ' राणे, ' माहितीये मला कदम, पण या पिक्चर वरूनच आजकालची पिढी सगळं शिकतीये. '

धागे - दोरे ( भाग ४)

राणे ५ मिनिटात परत येतात, ' साहेब, ती येते म्हटली ३० मिनिटात. ' ' छान. बरं, राणे, तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेलात तेव्हा काय - काय माहिती कळाली.' ' साहेब, त्या दिवशी त्यांच्या ऑफीस ची पिकनिक म्हणून हे सगळेच फार्महाऊस वर गेलेले. सगळे मिळून १८ जण होते. मी त्या बंगल्याच्या केअरटेकरशी बोललो, रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी चालू होती. समर त्या कंपनीत आधी काम करायचा आणि तिथेच असताना त्याचं आणि रुबीच प्रेमप्रकरण सुरु झालं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब हा बंगला खून झालेल्या बंगल्याच्या जवळच आहे.’ ' राणे, त्या दिवशी त्या पार्टीमध्ये कोण-कोण होत त्यांची लिस्ट बनवा आणि प्रत्येकाची चौकशी करा. मला जाणून घ्यायचय त्या दिवशी पार्टीमध्ये काही वेगळं घडलं का?, ती पार्टी कोणी अरेंज केली ? आणि ती जागा कोणी डिसाईड केली ? उद्याच सगळ्यांना इथे बोलावुन घ्या आणि प्रत्येकाची चौकशी करा. ' ‘ ठीक आहे साहेब.' थोड्याच वेळात रुबी आली. आकर्षक राहनिमाण, लाईट असा मेकअप, मोहक असे डोळे... पहिल्यांदाच असं कोणीतरी पोलीस ठाण्यात आली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. ह

धागे - दोरे (भाग ३)

पांडुरंग ने सांगितल्याप्रमाणे इ.जाधव ची मदत केली आणि त्यांनी ड्रग्स विकणाऱ्याला एक जाळं बनवून पकडलं. पण अजूनही समर मर्डर केस सॉल्व्ह झाली नव्हती.  विचार करत असताना अचानक इ.जाधवला ती चमकणारी वस्तू आठवते जी त्यांना गेटजवळ सापडते. ते लगेच राणेला आवाज देतात.  'बोला साहेब' 'मी तुम्हाला एव्हिडन्स बॅगमध्ये टाकून एक वस्तू दिली होती जी मला त्या बंगल्याजवळ सापडली होती. ती घेऊन या. ' 'हो. साहेब.' राणे जाऊन एव्हिडन्स बॅग घेऊन येतात. त्यात एक मोठा डायमंड असलेलं गोल्डचं कानातलं असत.  ते निरखून पाहिल्यानंतर त्यावर एक लोगो दिसतो तो एका मोठ्या ज्वेलर्स चा लोगो असतो. इ.जाधव ते कानातलं घेऊन हवालदाराला देतात.  ' सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये या कानातल्याचा फोटो पाठवा आणि इनामदार ज्वेलर्सच्या सगळ्या शाखांमध्ये जाऊन याची डिटेल्स काढा.’ तेवढयात कदम येतात आणि समरच्या मोबाईल ची कॉल डिटेल्स देतात. ' कदम मोबाईल ट्रॅक झाला का ?' इ.जाधव कॉल डिटेल्स निरखून पाहत ' नाही सर, आम्ही त्याच्या IMEI नंबर वरून पण ट्रॅक करायचा प्रयत्न केला, पण मोबाईल अजून चालूच केला गेला नाही.&

धागे - दोरे (भाग २)

इ.जाधव, ‘ राणे, आपण नंतर बोलू. मॅडम साठी चहा सांगा. माफ करा समजू शकतो तुमची परिस्थिती पण चौकशी करणं तेवढंच गरजेचं आहे. मला त्या दिवशी नेमक काय घडल ते सगळं सांगा.’ मीरा ने पाण्याचा एक घोट घेत सांगायला सुरुवात केली, ' आम्ही ठाण्याला राहतो. आमच्या दोघांचे आईवडील गावी असतात. १ वर्ष झाल आमच्या लग्नाला. समर आणि मी, मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहोत. रोजच आपलं तेच रूटीन, लवकर उठा ऑफिस ला जा आणि येऊन घरचं उरका. मला कंटाळा आलेला म्हणून मीच समर ला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मग समर ने मला या गेस्टहाऊस बद्दल सांगितल आणि आम्ही आलो इकडे २ दिवस रहायला. पांडुरंग ने आम्हाला पाणी दिलं. फ्रेश होऊन बसलो गप्पा मारत. मग पांडुरंग ने जेवण आणून दिलं. ते जेवलो आणि मग दमल्यामुळे लवकर झोपलो. रात्री तहान लागली म्हणून उठले. तर पाणी च नव्हतं म्हणून खाली किचन मध्ये जाऊन बॉटल भरून आणली आणि येऊन बघते तर समर रक्ताच्या थारोळ्यात होता. मग माझा आवाज ऐकुन पांडुरंग धावत आला आणि मग तुम्हाला कॉल करून बोलावून घेतल.’ मीरा हळूच डोळ्याच्या कडा पुसत होती. इ.जाधव, ' बरं, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कळवलत का ?

धागे - दोरे (भाग १)

रात्री २ च्या दरम्यान मीराला तहान लागते म्हणून ती उठते पण बाटलीतलं पाणी संपलेलं होत म्हणून ती बाटली घेऊन किचनमधून भरून घेऊन बेडरूममध्ये येते आणि समोरच दृश्य पाहून जोरात किंचाळते, तिला काय करायचं काहीच कळेना. तिचा नवरा समर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. ती जवळ जाऊन पाहते पण त्याचा श्वास बंद पडलेला असतो. स्वतःला सावरून ती पोलिसांना फोन करून कळवते. थोड्याच वेळात तिथे पोलीस येतात. तिथला केअर टेकर पांडुरंग पण तिथे हजर झालेला असतो. इन्स्पेक्टर जाधव त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तिथे हजर होतात. मीरा एका बाजूला रडत बसलेली असते. इ .जाधव, ‘ (बॉडीकडे वळून निरीक्षण करत) कदम बॉडी ताब्यात घ्या आणि पंचनाम्याला पाठवा. राणे बॉडी च्या आजूबाजूला काही पुरावे मिळत आहेत का बघा. (नंतर मिराकडे वळून) तुम्हीच कॉल केला होता का ?’ मीरा, ‘ हो.’ इ. जाधव, ‘ हे तुमचे कोण ?’ मीरा, ‘ मी मीरा. हा माझा नवरा समर ‘ (तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसत) इ.जाधव, ‘हे बघा तुम्ही स्वतःला सावरा.’ पुढे काही बोलणार तितक्यात, मीरा चक्कर येऊन खाली पडते. इ.जाधव, ‘ सावंत बाई यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा लवकर. मीराला घेऊ