पांडुरंग ने सांगितल्याप्रमाणे इ.जाधव ची मदत केली आणि त्यांनी ड्रग्स विकणाऱ्याला एक जाळं बनवून पकडलं. पण अजूनही समर मर्डर केस सॉल्व्ह झाली नव्हती.
विचार करत असताना अचानक इ.जाधवला ती चमकणारी वस्तू आठवते जी त्यांना गेटजवळ सापडते. ते लगेच राणेला आवाज देतात.
'बोला साहेब'
'मी तुम्हाला एव्हिडन्स बॅगमध्ये टाकून एक वस्तू दिली होती जी मला त्या बंगल्याजवळ सापडली होती. ती घेऊन या. '
'हो. साहेब.'
राणे जाऊन एव्हिडन्स बॅग घेऊन येतात. त्यात एक मोठा डायमंड असलेलं गोल्डचं कानातलं असत.
ते निरखून पाहिल्यानंतर त्यावर एक लोगो दिसतो तो एका मोठ्या ज्वेलर्स चा लोगो असतो. इ.जाधव ते कानातलं घेऊन हवालदाराला देतात.
' सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये या कानातल्याचा फोटो पाठवा आणि इनामदार ज्वेलर्सच्या सगळ्या शाखांमध्ये जाऊन याची डिटेल्स काढा.’
तेवढयात कदम येतात आणि समरच्या मोबाईल ची कॉल डिटेल्स देतात.
' कदम मोबाईल ट्रॅक झाला का ?' इ.जाधव कॉल डिटेल्स निरखून पाहत
' नाही सर, आम्ही त्याच्या IMEI नंबर वरून पण ट्रॅक करायचा प्रयत्न केला, पण मोबाईल अजून चालूच केला गेला नाही.'
'ठीक आहे पण मोबाईल कंपनीला सांगून ठेवा ते चेक करत रहायला जर खुन्याकडे ते सिम किंवा मोबाईल अजूनही असेल तर कधी ना कधी तो ते चालू करून चेक करेल.'
कॉल डिटेल्स चेक करत असताना इ.जाधव ने शेवटचे दोन नंबर चेक केले. त्या दोन्ही नंबरची डिटेल्स काढल्यावर कळलं कि एक नंबर त्याचा मित्र पक्या तर लास्ट नंबर सिकंदर नावाच्या एका माणसाचा होता.
'राणे, या सिकंदर बद्दल मला डिटेल माहिती हवी आणि तीपण आजच.'
'काय झालं साहेब ?'
'सांगतो, मला आधी समरचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बघून त्याच्या खुनाची वेळ सांगा.' टेबले वरच्या बाटलीतुन पाण्याचा एक घोट घेत इ.जाधव
त्यांना आशा होती कि नक्कीच आता आपल्याला यातून काहीतरी हिंट मिळेल.
फाईल मध्ये चेक करत राणे,' सर, २.०५ am '
'राणे, या सिकंदरचा समरला फोन आलेला १२.१५ am ला. मला लवकरात लवकर या माणसाची डिटेल्स दया.'
'हो सर' म्हणून राणे निघून गेले.
इ.जाधव ने मीराला कॉल केला.
'हॅलो, मिस मीरा मला तुमच्याशी काही बोलायचं होतं.'
'हो सर, बोला ना’
'खुनाच्या दिवशी समरला कोणा -कोणाचे कॉल आलेले?'
१-२ सेकंद विचार करून, 'हा पक्याचा आलेला. समरचा मित्र, बंगल्याबद्दल विचारायला'
'अजून कोणाचा आलेला का?'
'नाही सर'
'ठीक आहे. धन्यवाद.'
‘काही कळलं का सर ?’
‘नाही अजून. पण लवकरात लवकर कळेल.’
राणे, ' साहेब त्या सिकंदरची सगळी माहिती काढून आलो.'
इ.जाधव, ' वाह... राणे , सांगा लवकर '
राणे, 'हा सिकंदर एक रिक्षावाला आहे सर. त्याचा समरशी किंवा त्याच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही.'
कदम, 'पण मग त्याने समरला एवढ्या रात्री का फोन केला?'
राणे, 'त्याच्या नावावर कोणीतरी दुसऱ्याने सिम घेतलं आणि त्याच्यावरून कॉल केलेला.'
इ.जाधव निराश झालेले, आता कुठे काहीतरी हाताला लागतंय असं वाटलं पण हाती निराशा आली.
तेवढ्यात हवालदार मिरकुटे आले.
'साहेब, ते कानातल, मुलुंड, राम नगरच्या शाखेतून घेतलं गेलय.'
'बिल कोणाच्या नावावर आहे?'
'साहेब, बिल कोणी रुबीच्या नावावर आहे.'
'रुबी'
'ठीक आहे. राणे..... ' इ.जाधव च वाक्य पूर्ण व्हायच्या आधिच राणेंनी काम हातात घेतलं होत.
'साहेब, या रुबी बद्दल माहिती काढून आजच देतो तुम्हाला.'
दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आणि कामाला लागतात.
संध्याकाळी इ.जाधव आणि कदम चहाचे घोट घेत असतानाच राणे येतात.
' साहेब, खूप महत्त्वाच्या गोष्टी कळल्या आहेत '
' या राणे, चहा घ्या आणि पटकन मला काय ते सांगा '
' हो साहेब, मला माहितीये जोपर्यंत केस सॉल्व होत नाही तोपर्यंत आपल्याला चैन नाही पडणार.'
राणेंचा चहा पिऊन होईपर्यंत सगळे मुकाट बसून त्यांच्याकडेच पहात बसलेले.
राणेंनी पण पटकन चहा नरडयात ओतला. तोंड थोडंसं भाजलच पण त्यांनाही सांगायची घाईच झालेली.
' तर साहेब ही रुबी तिच आहे त्या समर चं पहिलं झेंगाट.'
' म्हणजे लग्नाआधी त्याच अफेअर होतं ती हीच काय ?'
' हो साहेब, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी ती सुद्धा त्याच एरियात होती.'
' काय? ' कदम
' अहो कदम मी म्हटल….की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी ती सुद्धा त्याच एरियात होती.'
' राणे, ते मला कळलं पण ती त्या वेळेस त्याच एरियात काय करत होती ?'
' तेच तर, मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन चेक केल. त्यादिवशी त्यांच्या ऑफिसची पार्टी होती. त्यामुळे त्यांच्या ऑफिसचा बराचसा स्टाफ तिथेच होता.'
' ठीक आहे. राणे, एक काम करा….'
' तिला कॉल करून बोलावून घेतो आणि नाही आली तर जाऊन घेऊनच येतो साहेब.'
' अरे वाह...राणे, माझे सहकारी आता सुपर फास्ट झालेत. '
' मग काय तुमच्या सोबत राहून तुमच्या सारखं काम शिकायलाच हवं '
असं बोलून राणे निघून जातात आणि ५ मिनिटात परत येतात साहेब ती येते म्हटली ३० मिनिटात.
क्रमशः
Comments
Post a Comment