रात्री २ च्या दरम्यान मीराला तहान लागते म्हणून ती उठते पण बाटलीतलं पाणी संपलेलं होत म्हणून ती बाटली घेऊन किचनमधून भरून घेऊन बेडरूममध्ये येते आणि समोरच दृश्य पाहून जोरात किंचाळते, तिला काय करायचं काहीच कळेना. तिचा नवरा समर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. ती जवळ जाऊन पाहते पण त्याचा श्वास बंद पडलेला असतो. स्वतःला सावरून ती पोलिसांना फोन करून कळवते. थोड्याच वेळात तिथे पोलीस येतात. तिथला केअर टेकर पांडुरंग पण तिथे हजर झालेला असतो. इन्स्पेक्टर जाधव त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तिथे हजर होतात. मीरा एका बाजूला रडत बसलेली असते.
इ .जाधव, ‘ (बॉडीकडे वळून निरीक्षण करत) कदम बॉडी ताब्यात घ्या आणि पंचनाम्याला पाठवा. राणे बॉडी च्या आजूबाजूला काही पुरावे मिळत आहेत का बघा. (नंतर मिराकडे वळून) तुम्हीच कॉल केला होता का ?’
मीरा, ‘ हो.’
इ. जाधव, ‘ हे तुमचे कोण ?’
मीरा, ‘ मी मीरा. हा माझा नवरा समर ‘ (तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसत)
इ.जाधव, ‘हे बघा तुम्ही स्वतःला सावरा.’
पुढे काही बोलणार तितक्यात, मीरा चक्कर येऊन खाली पडते.
इ.जाधव, ‘ सावंत बाई यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा लवकर.
मीराला घेऊन सावंत बाई जातात. इ.जाधव आता पांडुरंग कडे वळतात.
इ.जाधव, ‘ तुम्ही कोण?’
पांडुरंग, ‘ मी इथला केअरटेकर आहे. इथे येणाऱ्या पाहुण्यांना काय हवं-नको ते बघतो आणि बंगला खाली असेल तेव्हा साफसफाईची कामं करतो.’
इ.जाधव, ‘ आणि या बंगल्याचे मालक?’
पांडुरंग, ‘ मालक इथे राहत नाहीत, ते वरळीला राहतात. कधीतरी इकडे येतात.’
इ.जाधव, ‘ ठीक आहे. खून झाला तेव्हा तू कुठे होतास?’
पांडुरंग, ‘ साहेब मी माझ्या खोलीत होतो.’
इ.जाधव, ‘ तू इथेच राहतोस म्हणजे?’
पांडुरंग, ‘ नाही साहेब म्हणजे जर कोणी पाहुणे असतील तर बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटी खोली आहे तिथे राहतो नाहीतर इथून थोडं लांब खोपोली गाव आहे तिथे राहतो बायका- पोरांसोबत.’
इ.जाधव, ‘ ठीक आहे. जोपर्यंत खुन्याचा शोध लागत नाही तोपर्यंत हे शहर सोडून जायचं नाही.’
पांडुरंग (डोक्यावरचा घाम टिपत), ‘ ठीक आहे साहेब.’
इ.जाधव, ‘ तु जा आता आम्हाला काही माहिती हवी असेल तर बोलावून घेऊ तुला.’
पांडुरंग, ‘ ठीक आहे साहेब.’
इ.जाधव, ‘ कदम तुम्हाला काय वाटत ?’
कदम, ‘ साहेब मला या पांडुरंग वर शंका आहे, कसा घाबरल्यासारखा वाटत होता बोलताना. पण साहेब तुम्हाला काय वाटत, ते मला जाणून घ्यायचय. तुम्ही आतापर्यंत इतक्या केसेस शिताफीने सॉल्व्ह केल्या आहेत. नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी आलं असेलच.’
इ.जाधव, ‘ केस सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला थोडं जास्त सावध असावं लागत आणि सगळ्या बाजू पडताळुन पाहण्याची गरज असते. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. पांडुरंग नक्कीच काहीतरी लपवतोय आपल्यापासून. कदम एक हवालदार त्याच्या पाळतीवर ठेवा आणि त्या दोघांच्या घरी फोन करून कळवा.’
कदम, ‘ ठीक आहे साहेब.’
दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण आप-आपल्या कामात बिझी असतात.
इ.जाधव केस ची फाईल चेक करत, ' कदम, सावंत बाईंना सांगा.. त्या मीराच्या तब्येतीची चौकशी करा आणि जर ती आता बरी असेल तर तिला घेऊन इकडे या. '
कदम, ‘ हो साहेब.’
इ.जाधव, ‘ राणे काल आपल्याला ज्या काही वस्तु मिळाल्या बॉडी शेजारी त्याची लिस्ट मला द्या आणि त्याची माहिती काढायला सांगितलेली ती काढली का ?’
राणे, ‘ हो साहेब. हि घ्या लिस्ट. त्याच नाव समर. मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता. स्वभावाने शांत होता, कोणाशी भांडण नव्हतं. ‘
इ.जाधव (हसत) , ‘ राणे, आता पॉइंटवर या…’
राणे, ‘ साहेब, लग्नाआधी लफडं होत..’
इ.जाधव, ‘ राणे...लफडं नाही ... अफेअर म्हणा हो..’
राणे, ‘ तेच ते हो साहेब. फरक एव्हडाच कि मी मराठीतून म्हटलं आणि तुम्ही इंग्रजी.’
दोघेही हसतात. तेवढयात सावंत बाई मीराला घेऊन येतात.
इ. जाधव, ‘ नमस्कार. बसा. कशी आहे आता तुमची तब्येत?’
मीरा, ‘ ठीक आहे.’
इ.जाधव, ‘ राणे, आपण नंतर बोलू. मॅडम साठी चहा सांगा. माफ करा समजू शकतो तुमची परिस्थिती पण चौकशी करणं तेवढंच गरजेचं आहे. मला त्या दिवशी नेमक काय घडल ते सगळं सांगा.
Comments
Post a Comment