इ.जाधव, ‘ राणे, आपण नंतर बोलू. मॅडम साठी चहा सांगा. माफ करा समजू शकतो तुमची परिस्थिती पण चौकशी करणं तेवढंच गरजेचं आहे. मला त्या दिवशी नेमक काय घडल ते सगळं सांगा.’
मीरा ने पाण्याचा एक घोट घेत सांगायला सुरुवात केली, ' आम्ही ठाण्याला राहतो. आमच्या दोघांचे आईवडील गावी असतात. १ वर्ष झाल आमच्या लग्नाला. समर आणि मी, मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहोत. रोजच आपलं तेच रूटीन, लवकर उठा ऑफिस ला जा आणि येऊन घरचं उरका. मला कंटाळा आलेला म्हणून मीच समर ला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मग समर ने मला या गेस्टहाऊस बद्दल सांगितल आणि आम्ही आलो इकडे २ दिवस रहायला. पांडुरंग ने आम्हाला पाणी दिलं. फ्रेश होऊन बसलो गप्पा मारत. मग पांडुरंग ने जेवण आणून दिलं. ते जेवलो आणि मग दमल्यामुळे लवकर झोपलो. रात्री तहान लागली म्हणून उठले. तर पाणी च नव्हतं म्हणून खाली किचन मध्ये जाऊन बॉटल भरून आणली आणि येऊन बघते तर समर रक्ताच्या थारोळ्यात होता. मग माझा आवाज ऐकुन पांडुरंग धावत आला आणि मग तुम्हाला कॉल करून बोलावून घेतल.’
मीरा हळूच डोळ्याच्या कडा पुसत होती.
इ.जाधव, ' बरं, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कळवलत का ?'
' हो '
' मला एक सांगा, या गेस्टहाऊसची माहिती तुम्हाला कोणी दिली? '
' समर चा मित्र, पक्या '
' त्याचा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे ? '
' नाही. पण समर चा मोबाईल आहे ना तुमच्याकडे त्यात तुम्हाला मिळेल. '
इ.जाधव, ' कदम, समर जवळ आपल्याला कुठला मोबाईल सापडला का ?'
कदम, ' नाही सर, तेच खूप आश्चर्यकारक वाटल मला...एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतो आणि मोबाईल नाही, कस शक्य आहे? आम्ही सगळ्या खोल्या शोधून काढल्या पण कुठेच मोबाईल सापडला नाही.'
मीरा, ' शक्यच नाही. समर बराचवेळ मोबाईल वर काही बघत होता आणि मग आम्ही झोपलो. तो झोपलेला, त्या बाजूच्या टेबलवर त्याचा मोबाईल होता.'
इ.जाधव, ' याचा अर्थ त्याचा मोबाईल खून्याने जाताना उचलला. नक्कीच त्यात काहीतरी महत्वाचं असेल. कदम एक काम करा. मोबाईल कंपनीत जाऊन, त्याचा मोबाईल ट्रॅक करा. काही लोकेशन मिळते का बघा. आणि त्याचे कॉल डिटेल्स पण काढा '
कदम आपल्या कामाला लागतात.
' मीरा तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणावर संशय ? काही विचित्र गोष्ट त्यारात्री झालेली तुम्हाला आठवतेय ? '
' नाही सर.'
इ.जाधव, ' बर, निघा तुम्ही. काही आठवलं तर ...नक्की सांगा.'
मीरा निघून जाते.
इ.जाधव, ' राणे आपल्या हाती काहीच नाही अजून म्हणजे नक्कीच काहीतरी राहिलय आपल्या हातुन. पुन्हा एकदा आपण चेक केलं पाहिजे.
चव्हाण, या गेस्टहाऊसबद्दल आणि याच्या मालकाबद्दल जितकी माहिती काढता येईल तितकी माहिती काढा. राणे, तुम्ही माझ्या सोबत चला. आपण पुन्हा त्या गेस्टहाऊसवर जाऊन बघुया काही सापडतं का '
गेस्टहाऊसवर पोहोचल्यावर ते पांडुरंग ला आवाज देतात पण तो काही सापडत नाही. ते त्याच्या पाठीमागच्या खोलीत त्याला जाऊन शोधायचा प्रयत्न करतात पण कोणीच सापडत नाही. तिथलं त्याच सगळं सामान गायब असतं. गेट मधून बाहेर पडताना अचानक उन्हामुळे एक छोटीशी वस्तू चमकताना इ.जाधवना दिसते, उचलून बघतात तर ते एक हिऱ्याचं कानातलं असतं. कानातलं एव्हिडन्स बॅग मध्ये ठेवून राणे कडे देतात.
ते दोघेही तिथून लगेच त्याच्या घरी जातात, तिथे गेल्यावर त्यांना त्याच्या घराला कुलुप दिसतं. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळतं की तो १ तासापूर्वी , त्याच्या कुटुंबासोबत सगळं सामान घेऊन निघून गेला. कुलुप तोडून ते आत जातात आणि झडती घेऊ लागतात. तेवढ्यात इ.जाधव ला तिथे एक डायरी दिसते ज्याचं पान गडबडीत फाडलेल असतं.
त्याच्या खालच्या पानावर काहीतरी अस्पष्ट अस कोरल गेलेलं असतं. जाधव पेन्सिली ने हळूच त्यावर रेघोटे मारतात आणि त्यावर लिहिलेली अक्षरं थोडीफार दिसू लागतात.
त्यावर उद्यान एक्सप्रेस अस लिहिलेलं दिसत.
कदम ला फोन करून, जाधव त्याला लगेच उद्यान एक्सप्रेस ची माहिती काढून, तपास करायला सांगतात. जाधव झडती घेत असताना. त्यांना तिथे
१ साधा मोबाईल सापडतो. ते ताब्यात घेतात.
अर्ध्याच तासात कदम चा फोन येतो की त्याने पांडुरंग ला पकडलं.
राणे (चहाचे घोट घेत) , ' साहेब पाहिलत यानेच खून केला आणि पळून जात होता.'
इ.जाधव, ' मला अजूनही वाटत नाही की पांडुरंग खून करू शकतो. एवढे वर्ष झाले तो, ते गेस्टहाऊस सांभाळतो आहे आणि समर आणि त्याची काही ओळख ही नाही.'
तेवढ्यात कदम, पांडुरंग च्या मुसक्या आवळून त्याला आत घेऊन येतो. पांडुरंग चा चेहरा घामाने भिजलेला आणि मधून मधून डोळ्यातून पाणीसुद्धा वाहत होतं. हात जोडून गयावया करत होता.
पांडुरंग, ‘साहेब, मी खरचं खून नाही केला हो…’
इ.जाधव, ' कदम सोडा त्याला आणि पाणी द्या.'
कदम, ' पण साहेब मी म्हटल होत ना, यानेच खून केला असणार, बघा कसा पळून चालला होता, हे बघा किती पैसे सापडले त्याच्याकडून...उद्यान एक्सप्रेस मध्ये बसणार च होता तेवढ्यात पकडला याला. '
पांडुरंग (पाणी पित), ' साहेब , खरचं सांगतो मी तुम्हाला, मी खून नाही केला '
इ.जाधव, ' हे बघ पांडुरंग, तु नक्कीच काहीतरी केलं आहेस म्हणुन पळून चालला होता आणि हे एवढे पैसे कुठून आले. तू जर खरं - खरं सांगितलस तर तुझी शिक्षा नक्कीच कमी करवून घेऊ.'
पांडुरंग, ' सांगतो साहेब, सगळ काही सांगतो...साहेब या पूर्ण एरियात सगळे बंगले आहेत. बऱ्याच वेळेला मोठ्या लोकांच्या पार्ट्या होतात इथं. २ वर्षांपूर्वी एकाने मला त्याच्याकडे असलेला कोकेन चा माल दाखवला म्हटला हे बंगले सांभाळून किती कमावशील. त्यापेक्षा माझा माल तुमच्या एरियात येणाऱ्या मोठ्या लोकांना विक. खूप पैसे कमावशील. तो फक्त मला माल आणून द्यायचा आणि मी ज्याला हवा त्याला विकायचो. खरं सांगतो साहेब, बाकी मला यातलं काहीच माहित नाही.’
इ.जाधव, 'तुला माहितीये ना कि हे गैरकानूनी आहे. '
'हो साहेब, पण काय करू तीन मुलांची शाळा आणि खर्च नाही भागत, बंगले सांभाळून.'
'हे बघ पांडुरंग, आम्ही तुझी शिक्षा नक्कीच माफ करून घेऊ पण तू जर आम्हाला तुला ड्रग्स देणाऱ्या माणसाला पकडवून देण्यात मदत केलीस तर ‘
'हो साहेब, तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे.'
पांडुरंग ने सांगितल्याप्रमाणे इ.जाधव ची मदत केली आणि त्यांनी ड्रग्स विकणाऱ्याला एक जाळं बनवून पकडलं. पण अजूनही समर मर्डर केस सॉल्व्ह झाली नव्हती.
विचार करत असताना अचानक इ.जाधवला ती चमकणारी वस्तू आठवते जी त्यांना गेटजवळ सापडते. ते लगेच राणेला आवाज देतात.
Comments
Post a Comment