Skip to main content

Posts

Showing posts from 2017

खिडकी भाग- ३

अ नघा, नंदिनी आणि अर्णव असा तिघांचा छान ग्रुप झालेला. अर्णव पण बोलका असल्यामुळे अनघाही त्याच्याशी बोलु लागली. अर्णवला ऑफिस जॉईन करून 6 महिने झालेले. अनघाचा स्वभाव त्याला आवडू लागला होता, हळूहळू तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात तयार होत होता. अनघा कधी आली नाही की त्याच मन कासावीस होई., कामात नीट लक्ष लागत नसे. नंदिनी प्रमाणे त्यानेही बरंच काही ऐकलं होतं तिच्याबद्दल पण तो लक्ष देत नसे. एकदा तन्वी आजारी पडली आणि अनघा ऑफिसला आली नाही. लंचब्रेक झाला. त्याला नंदिनीला अनघाबद्दल बरच काही विचारायचं होतं आणि आज ती संधी त्याला मिळाली होती. अर्णव : अनघा का नाही आली ग आज ? नंदिनी : तिची मुलगी आजारी आहे रे. अर्णव : ओह.. अर्णव : नंदिनी, आपण दोघेही सगळं सांगतो तिला आपल्या फॅमिलीबदद्दल पण तीची turn आली की मात्र ती नेहमी विषय बदलते. नंदिनी : हो, ती तशीच आहे रे. थोडी वेगळी आहे पण मनाने चांगली आहे. अर्णव : तुला माहितीये नंदिनी ऑफिस मध्ये तिच्याबद्दल काहीही बोललं जातंय...म्हणजे मी त्यावर विश्वास ठेवत नाही पण तरीही खरं काय ते कळायलाच हवं. नंदिनी : अरे, एवढं का tension घेतोस...हे ब...

खिडकी भाग१/१.२

खिडकी भाग १/१.२ त न्वीची समजुत घालुन तिने तिला झोपवलं आणि विचार करता करता तिची झोप कधी लागली कळलंच नाही आणि जाग आली तेव्हा घड्याळात ५.३० वाजलेले. अनघाची धावपळ सुरू झाली. पटा...

खिडकी भाग-१

खिडकी भाग-१ स काळी 4.30 चा गजर झाला. इच्छा नसतानाही उठावं लागतं होतं. डोळे न उघडताच उजव्या हाताने, टेबलवर ठेवलेल्या मोबाईलचा गजर बंद केला आणि आरशात बघत बेसिन मधे तोंड धुतलं. रोज...

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प...

रेशीमगाठी...भाग ८

नि कीताने फेसबुक चालू केल आणि निखिलने पाठवलेली तिसरी फ्रेंड रिक्वेस्ट तिने डिलीट केली. तिने आज मनाशी निर्णय घेतला आणि निखीलशी जे काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं ठरवलं त्याप्रमाणे तिने निखिलला भेटायला बोलावलं. सकाळपासूनच त्याच्याशी काय बोलायचं ...त्याला काय विचारायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं. निकिताला भेटायला जायचं म्हणून निखिल खुश होता पण निकिताने काही महत्वाचं बोलायचंय असं म्हटल्यावर मात्र निखिलच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याच्या सोबत जे आधी झालं होतं त्यामधून तो कसातरी सावरला होता आणि आता पुन्हा निकिताने असं बोलावलं तेव्हा त्याला परत भीती वाटू लागली. ते दोघेही कॉफी शॉपमधे भेटले. निखिल आधीपासूनच तिथे उभा राहून तिची वाट पहात होता. निकिता आली, थोडी गंभीर दिसत होती ती. निखिलने तिच्याकडे हसून पाहिलं मग तिनेही ओठ ताणून थोडस हसल्यासारखं केलं. निखिलने घाबरत का होईना पण विषयाला हात घातला, “बोला… काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला ?” निकिता, “मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होत..” निखिल तिच्याकडे पहात, “विचारा” निकिता, “म्हणजे….मला भीती वाटतेय” निखिल दचकून एकडे तिकडे बघत, “ कोणाची ?...

रेशीमगाठी...भाग ७

नि खिल खूप समजदार आणि हुशार होता. त्याने निकीता बद्दल जमेल तेवढी माहिती काढली होती. दुसऱ्यादिवशी आई निकिताला निखीलबद्दल विचारू लागली. निकिता, “अग, असं कसं सांगू… कालच तर बघून गेले, मला तो कसा आहे, त्याचा स्वभाव तरी कळायला हवा.” आई, “आतमध्ये तुमच्यामध्ये काही बोलणं झालं की नाही ?” निकिता, “झालं तस रेशीमगाठी...भाग ७ बोलणं, तो मला स्वतःबद्दल सगळं सांगत होता, पुढे त्याने काही विचार केलाय आयुष्याबद्दल ते सांगत होता. बोलण्यावरून तरी खूप समंजस वाटत होता.” मधेच तीच बोलणं काटत आईने विचारलं, “तुला काही विचारलं ?” निकिता, “हो, हेच कि तुला काय पुढे करायची इच्छा आहे ? तुला जस रहायला आवडेल तस रहा, मला काही प्रॉब्लेम नाही” आई, “घरचे पण तसे चांगले वाटले पण त्यांचे संबंध आपल्यात बसत नाहीत.” दोन दिवस झाले तरीही काही निकीता च्या घरच्यांकडून उत्तर आलं नाही म्हणून शेवटी त्यानेच कॉल केला निकीताच्या आईला आणि त्याने होकार कळवला. निखिलकडे निकीताचा नंबर होता पण त्याची हिंम्मतच होत नव्हती, तिला काय वाटेल या विचाराने. शेवटी हिंम्मत एकवटून त्याने तिला मेसेज केला. निखिल, “नमस्कार” निकिता...