Skip to main content

भाग्यरेषा.... भाग ३


शोभाला मात्र स्वतःचीच लाज वाटत होती. नक्की काय कमी पडली तिच्या प्रेमात की सुनिलने तिच्याशी असं वागावं.

इकडे सुनिल मात्र दोन दिवसात घरी परतला. परशुरामचे डोळे शोभाला शोधत होते, पण सुनिल एकटाच होता. परशुराम उठून सुनिलला शोभाबद्दल विचारू लागला, “ सुनिल, शोभा कुठे आहे ?”

सुनिल, “ती मुंबईत हरवली”

परशुराम, “काय ? अशी- कशी हरवली? तु कुठे होतास ?”

सुनिल , “मी तिच्या सोबतच होतो. तीच कुठे गेली काय माहीत, मला वाटतंय ती तिच्या यारसोबत पळून गेली.”

परशुराम, “ तोंड सांभाळून बोल. शोभा तशी नाही.”

सुनिल, “ मग कशी आहे ?, तुम्ही नका सांगू मला, वेडं बनवलं तिने आपल्या सगळ्यांना, सगळे दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली ती.”

सुनिल जोरजोरात रडून परशुरामच्या गळ्यात पडतो.

सुनिल, “अहो बाबा तुम्ही खूप साधे आहेत त्याचाच फायदा उचलला तिने. बरं झाली ती अवदसा गेली.”

परशुराम, “सुनिल, तोंड बंद कर तुझं”

सुनिल, “ तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा तिची जास्त काळजी आहे. मला एकदा तरी विचारलत मी कसा आहे?”

परशुराम, “ मला विश्वास नाही बसते. शोभा असं नाही करू शकत."

सुनिल, “असच झालय बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर”

परशुराम डोक्याला हात लावून तिथेच खाली बसतात. त्यांना काहीच सुचत नव्हतं. घरात एकदम शांतता पसरली. त्या दिवशी कोणीच कोणाशी काही बोलेना. अनिल हे सगळं आतून ऐकत होता त्यालाही ते खरं वाटलं नाही. तो याबद्दल परशुरामशी बोलला. दोन दिवसांनी सुनिल परत आधीसारखा वागु लागला. फुल्ल दारू पिऊन आला. तिसऱ्या दिवशी त्याने कमळा ला घरात आणलं. तिच्या गळ्यात शोभाचा हार पाहून परशुराम फारच चिडले आणि त्याच नाटक त्यांच्या लक्षात येऊ लागल. त्यांनी दोघांना घराबाहेर काढलं आणि एकाएकी जोरात रडून खालीच कोसळले.

परशुराम, “कुठे असेल ही पोर ?, काय केलं असेल या कारट्याने… “

सुनिल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला ढकलून देतात.

परशुराम, “अरे लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायची. ती बिचारी एवढं प्रेम करत होती तुझ्यावर. तिच्याबद्दल वेडंवाकडं बोलताना लाज वाटायला पाहिजे तुला. शोभाने जाताना घातलेला हार तु हिला दिला घालायला? आत्ताच्या आता निघून जा इथून आणि ती जिथे असेल तिथून शोधून आण. तिला घेऊन आलास तरच तुझं तोंड दाखव, चालता हो…”

अनिल ला सगळं ऐकू येत होतं आणि कळतही होत पण आज पहिल्यांदा आपण अपंग आहोत आणि काहीच करू शकत नाही याची लाज वाटत होती. परशुराम पण भोवळ येऊन तिथे पडतो.

कमळा मात्र रागारागाने तिथून निघून जाते आणि तिच्या पाठी सुनिल.

कमळा, “असला कसला तुझा बाप. ह्यो हार त्या काळीपेक्षा माझ्या गळ्यात जास्त झ्याक दिसतोय. आन तिच्यापायी तुला का बर घरातून काढलं? डोकं फिरलय का त्याच ? आता काय करणार हायेस तु ?”

सुनिल, “नको घेऊ दे घरात मी इथेच राहीन तुमच्यासोबत”

कमळा हे ऐकून चिडली.

घरी आल्यावर सुनिल ला बाहेर बसवून कमळा आणि श्यामराव आतल्या खोलीत जाऊन बोलत बसले.

कमळा, “ कसला प्लॅन केला व्हतास, त्याचा पैसा राहिला बाजूला आणि हाच आला अजून मानगुटीवर बसायला. याला आदी बाहेर काढ. फुकट्या साला.”

श्यामराव, “अग ताई, वाईच दमान घे की तु. प्लॅन व्हता बराबर, तुला कुणी हा हार घालून जायला सांगितलं?” म्हातारा असला तरी डोकेबाज हाये त्यो. अजुन वेळ हाये, त्याला सांग बापाचे पाय धरून माफी माग आन शोधून आणतो म्हणावं”

कमळा, “ अरे येडा झालास का तु ?”

श्यामराव, “अग ऐकून तरी घे की, असं फक्त बोलायचं आणि मग नाही सापडली बोलायचं…आणि मग नंतर आपण आहोतच की त्या बेवड्याला लुटायला”

कमळा हसते आणि दोघे टाळी देतात.

तेवढ्यात सुनिल मात्र एकटाच पुढ्यात पडलेली बॉटल संपवण्याच्या नादात आत जातो आणि यांच कारस्थान ऐकतो… सगळं ऐकून आता सुनिलला स्वतःचीच लाज वाटु लागली, काही न बोलता तो तडक घरी परशुरामाची माफी मागायला जातो पण तो त्याला घरात घेत नाही. सुनिल शोभाला शोधून आणण्याच वचन देऊन तिथून निघतो. 

या एक महिन्याच्या काळात, स्वखुशीने देहविक्री करणारया मायाशी शोभाची चांगली मैत्री झाली. मायाला ३ वर्षाची मुलगी होती तिच नाव, मिरा. शोभा तिची आवडती मावशी झाली होती.

माया : कसला विचार करतेस ग ?

शोभा : काही नाही ग. छोटी-मोठी कामं करून जमवलेल्या पैशाने तिकीट काढून घरी जाईनही पण हा विचार सतत डोक्यात येतोय की आपण इथे राहत असलेली गोष्ट जर सगळ्यांना कळली तर...

माया : तुला माहिती आहे शोभा, अशी संधी सगळयांनाच मिळत नाही. मी एक अनाथ आहे. माझा नवरा सोडून गेल्यावर मिरा शिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही. आणि या क्षेत्रात मला याव लागल पण काहिही झालं तरी मिराला मी या सगळ्यापासून लांब ठेवीन. अक्का खूप चांगली आहे. तिने कसलीही जबरदस्ती तुझ्यावर केली नाही की कधी त्रास दिला नाही. या दलदलीत एकदा रुतलीस तर बाहेर निघनं कठीण आहे. तु इथुन जा. मला जमेल तेवढी मदत मी करेन.

हातातल खेळण टाकून मिरा, शोभा कडे येते आणि त्या दोघी तिच्याबरोबर खेळू लागतात.

एक दिवस सुनिल तिथे येतो आणि शोभाची चौकशी करत असतो अक्काला जेव्हा कळत की हाच शोभाला विकणारा तिचा नवरा आहे तेव्हा ती त्याचा अपमान करून त्याला तिथून हकलून देते. शोभा आता परत येणार नाही याची त्याला खात्री पटते. सुनिलला मात्र आता स्वतःच्या वागण्याचा फारच पश्चात्ताप होत असतो. त्याच मन त्याला आतल्या आत खात असतं. त्याच मानसिक संतुलन बिघडत आणि तो असाच वेड्यासारखा फिरु लागतो. इकडे परशुराम मात्र त्या दोघांच्या वाटेवर डोळे लावून बसलेले असतात. वरुन दिसायला कीतीही खंबीर असले तरी, सुनिलच्या वागण्याने ते आतुन तुटले होते.

एक दिवस माया आजारी पडली आणि आठवडाभर अंथरुणाला खिळून, त्या आजारपणातच तिचा मृत्यु झाला. मिरा आता पोरकी झाली होती पण शोभाने मोठ्या धैर्याने तिची जबाबदारी उचलली. शोभाला आता इथे राहून ३ महिने झाले होते. कुठे झाडलोट आणि कपडे-भांडी करून, रोजचा खर्च जाऊन आता तिने थोडे पैसे जमवलेले. अक्काचा आणि इतर लोकांचा निरोप घेऊन, आता ती मिरासोबत निघाली.

बसमध्ये बसल्यावर जेवढी शांती मनाला मिळाली, तितकच जोराच वादळ मनात सुटलं होत गावी पोहोचल्यावर. मिराला मात्र आज पहिल्यांदाच बाहेर पडल्यामुळे फारच मज्जा वाटत होती. दिवसभराचा प्रवास करून त्या दोघी थेरगावला पोहोचल्या. घराच्या दिशेने जाताना पावलं थोडी जड होऊ लागली होती, घरचे सगळे कसे असतील ?, मला स्विकारतील का ?, मिरा ला बघून काय म्हणतील ?.

घरासमोर उभी राहून शोभा शांतपणे दाराकडे बघत असते. ५ मिनीटांनी परशुराम बाहेर बसण्यासाठी म्हणून येतात आणि शोभाला बघून ते आनंदाने तिच्याजवळ धावत येतात. त्यांच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा वाहू लागतात. त्यांना बघून शोभाच्याही डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागतात. मिरा घाबरून शोभाच्या मागे जाऊन लपते.

परशुराम, "कुठे होतीस पोरी. तुझ्याशिवाय या घराला घरपण नाही. चल आपल्या घरी."

ते तिच सामान आत नेऊन ठेवतात. शोभाच्या पाठोपाठ मिराही आत येते. परशुराम मिराकडे पाहून हसतात तस मिरा ही त्यांना छानशी स्माईल देते. परशुरामने सुनिलबद्दल विचारताच आपल्याला त्याच्याबदल काहीच माहिती नसल्याचे ती सांगते.

दुसऱ्या दिवशी सगळं उरकल्यावर शोभाने स्वतःबद्दल आणि मिराबद्दल सगळी हकीकत परशुरामला सांगितली. त्यांना शोभाबद्दल आणखी आदर वाटु लागला. 

परशुराम," मला माफ कर मुली माझ्या मुलामुळे तुला एवढ सगळं सहन कराव लागल. आणि तुझ भाग्य थोर म्हणून तु या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलीस."

सुनीलचा मात्र शोध काही लागला नाही. कमळा आणि श्यामरावला पोलिसांनी फसवणुकीच्या चार्जमध्ये अटक केली.

शोभाच्या येण्याणे घराने आता परत लय धरली होती. मिराच्या रुपाने परशुरामला नात मिळाली होती. मिराही आता त्या घरात रूळत होती. तिच्या खेळण्या- बागडण्याने ते घर आता समृद्ध झाल होतं, जणु भाग्यानेच त्यांना इथे आणून जोडलं होतं.

               

                          -     समाप्त   - 

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा