Skip to main content

Posts

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प...

रेशीमगाठी...भाग ८

नि कीताने फेसबुक चालू केल आणि निखिलने पाठवलेली तिसरी फ्रेंड रिक्वेस्ट तिने डिलीट केली. तिने आज मनाशी निर्णय घेतला आणि निखीलशी जे काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं ठरवलं त्याप्रमाणे तिने निखिलला भेटायला बोलावलं. सकाळपासूनच त्याच्याशी काय बोलायचं ...त्याला काय विचारायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं. निकिताला भेटायला जायचं म्हणून निखिल खुश होता पण निकिताने काही महत्वाचं बोलायचंय असं म्हटल्यावर मात्र निखिलच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याच्या सोबत जे आधी झालं होतं त्यामधून तो कसातरी सावरला होता आणि आता पुन्हा निकिताने असं बोलावलं तेव्हा त्याला परत भीती वाटू लागली. ते दोघेही कॉफी शॉपमधे भेटले. निखिल आधीपासूनच तिथे उभा राहून तिची वाट पहात होता. निकिता आली, थोडी गंभीर दिसत होती ती. निखिलने तिच्याकडे हसून पाहिलं मग तिनेही ओठ ताणून थोडस हसल्यासारखं केलं. निखिलने घाबरत का होईना पण विषयाला हात घातला, “बोला… काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला ?” निकिता, “मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होत..” निखिल तिच्याकडे पहात, “विचारा” निकिता, “म्हणजे….मला भीती वाटतेय” निखिल दचकून एकडे तिकडे बघत, “ कोणाची ?...

रेशीमगाठी...भाग ७

नि खिल खूप समजदार आणि हुशार होता. त्याने निकीता बद्दल जमेल तेवढी माहिती काढली होती. दुसऱ्यादिवशी आई निकिताला निखीलबद्दल विचारू लागली. निकिता, “अग, असं कसं सांगू… कालच तर बघून गेले, मला तो कसा आहे, त्याचा स्वभाव तरी कळायला हवा.” आई, “आतमध्ये तुमच्यामध्ये काही बोलणं झालं की नाही ?” निकिता, “झालं तस रेशीमगाठी...भाग ७ बोलणं, तो मला स्वतःबद्दल सगळं सांगत होता, पुढे त्याने काही विचार केलाय आयुष्याबद्दल ते सांगत होता. बोलण्यावरून तरी खूप समंजस वाटत होता.” मधेच तीच बोलणं काटत आईने विचारलं, “तुला काही विचारलं ?” निकिता, “हो, हेच कि तुला काय पुढे करायची इच्छा आहे ? तुला जस रहायला आवडेल तस रहा, मला काही प्रॉब्लेम नाही” आई, “घरचे पण तसे चांगले वाटले पण त्यांचे संबंध आपल्यात बसत नाहीत.” दोन दिवस झाले तरीही काही निकीता च्या घरच्यांकडून उत्तर आलं नाही म्हणून शेवटी त्यानेच कॉल केला निकीताच्या आईला आणि त्याने होकार कळवला. निखिलकडे निकीताचा नंबर होता पण त्याची हिंम्मतच होत नव्हती, तिला काय वाटेल या विचाराने. शेवटी हिंम्मत एकवटून त्याने तिला मेसेज केला. निखिल, “नमस्कार” निकिता...

रेशीमगाठी...भाग ६

सं ध्याकाळ झाली आणि घरात गडबड सुरु झाली. नेहमीप्रमाणे नितेशची फुल पॅण्ट, बाबांचा पेपर आणि बातम्या. पाहुणे आले. निकिता आत मध्ये बसलेली. निकीताचा जासुस बनून नितेश गुपचूप आत आला आणि निकीताला बाहेरची परिस्थिती सांगू लागला. नितेश, “अग ताई, हे लोक पूर्ण खानदान च घेऊन आलेत.” निकिता घाबरून, “काय ? अरे फुकटच खायचं म्हणून एवढ्या लोकांनी यावं का ?” नितेश चहा द्यायला म्हणून परत बाहेर निघून गेला. निकीताला रागच आला त्यांचा. एवढ्या सगळ्यांना चहा, नाश्ता, बिचाऱ्या आईची किती धावपळ होते या सगळ्यात? तेवढ्यात आई आत आली निकीताला बोलवायला आणि निकिता बाहेर जाऊन तिच्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसली. तिने हळूच सगळ्यांकडे पाहिलं तर मुलगा, त्याचा भाऊ, त्याचे आई-वडील आणि काका-काकी आलेले. तिने हळूच मुलाकडे पाहिलं आणि त्याचक्षणी तिच्या लक्षात आलं की तो मुलगाही तिच्याकडेच पाहत होता आणि तिने लगेच नजर खाली केली. त्याच्या आईने ओळख करून दिली सगळ्यांची आणि नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. मुलानेही विचारले काही प्रश्न. नंतर आईने तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर आत जाऊन बोला असं म्हटलं. निकिता आणि तो म...

रेशीमगाठी...भाग ५

ऑ फिस मध्ये गेल्यावर, निकिताला आठवलं कि काल कांदेपोहे चा कार्यक्रम बाहेर चालू असताना आईच्या मोबाईल वर एक कॉल आलेला. एका मुलाचा...निकिता, “ हॅलो, कोण बोलतोय ?” समोरची व्यक्ती, “ मी निखिल देशमुख बोलतोय...रेशीमगाठी वर प्रोफाइल पाहिली, मला माझा रेशीमगाठी चा नंबर सांगायचा होता. तुम्ही निकिता का ?” निकिता, “ अ...नाही, मी तिची आई बोलतेय, तुम्ही रेशीमगाठी क्रमांक सांगा आम्ही  माहिती बघून कॉल करू तुम्हाला.” असं बोलून तिने एका कागदावर क्रमांक लिहून घेतला आणि फोन ठेवला. संध्याकाळी घरी गेल्यावर तिने आईला सांगितलं आणि तो कागद शोधू लागली पण तिला तो कागद सापडला नाही. आई मावशीसोबत फोनवर बोलत होती. निकिता हळूच त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती पण काहीच ऐकू येत नव्हतं. आई आणि मावशी एकदा बोलू लागल्या कि यांना कोणीच थांबवू शकत नाही. मावशीला मुली फार आवडायच्या पण तिला दोन्ही मुले असल्यामुळे तिचा निकिता वर खूप जीव होता. दुसऱ्याच दिवशी त्या मावशीच्या ओळखीच्या मुलाकडच्यांनी होकार कळवला. आई खुश झाली, तिने संध्याकाळी वडिलांना सांगितलं पण निकिताला त्या मुलाचा स्वभाव थोडा आवडला नव्हता हे त्या दोघा...

रेशीमगाठी...भाग ४

आ ज रविवार...सगळ्यांचाच आवडता दिवस, पण निकिताचा मूड खराब होता. आज संध्याकाळी, पुन्हा कांदेपोहे चा कार्यक्रम, काल च्या अनुभवामुळे तिला आज एवढी भीती वाटत नसली तरी मनात चलबिचल चालूच होती. तिने रेशीमगाठी चालू केल आणि त्या मुलाची माहिती बघू लागली, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आणि एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर होता. आईने जेवायला बोलावल आणि ती जेवायला गेली. वडील आईकडे बघत, “ काल आलेले त्यांचा काही निरोप ?” आईने नकारार्थी मान हलवली. वडील, “ आज संध्याकाळी येणार आहेत त्यांची माहिती काढली, आपली मंदाकिनी आत्या आहे ना त्यांच्या गावचे आहेत हे. तिने सांगितलं तस कि लोकं चांगली आहेत, पण जमिनीवरून काहीतरी वाद चालू आहेत सांगत होती.” आई, “ बाकी सगळं जाऊदेत पण मानस चांगली भेटणं महत्वाचं. अहो, माझी बहिण सिंधू आहे ना तिचा कॉल आलेला ती सांगत होती, बँकेत आहे मुलगा, वडील पोलीस मध्ये आहेत, 1 बहीण आहे. तिच्याच गावचे आहेत, दादर ला राहतात, ती ओळखते त्यांना.” वडील, “ बरं, मग फोटो आणि बायोडेटा सांग त्यांना पाठवायला, आपलापण पाठवून देऊ.” तिच्या बहिणीने आणलेलं स्थळ असल्यामुळे आई खुश होती आणि तिला खात्रीही...