Skip to main content

Posts

Showing posts from 2020

खरंच मुली कशा असतात ?

बापाघरी प्रेमाने आणि लाडाने वाढतात पण सासरी   स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा लाड करतात.... भाज्यांची नावे ऐकूनच नाही म्हणतात, तिकडे मात्र सगळ्या भाज्या आवडीने खातात.... खरंच मुली कशा असतात ? स्वतःच्या वस्तू संभाळण्यावरून आईचा ओरडा खातात पण सासरी पूर्ण घर - संसार सांभाळतात.... ऑफीस वरून थकून येणारया मुली, लग्नानंतर मात्र ऑफीस आणि घर दोन्ही जमवतात.... खरंच मुली कशा असतात...? जन्मदात्या आई - वडिलांना सोडून, लग्नानंतर अनोळखी लोकांना आपलेसे करतात.... बापाच्या छायेखाली वाढलेल्या, नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालतात.... खरंच मुली कशा असतात...?

धागे - दोरे (भाग ५)

राणे, ' होऊ शकत. ती पार्टी संपल्यावर येऊन त्याचा खून करून गेली. ' इ.जाधव , 'पण जर तिने खून केला असता तर ती त्याला भेटायला गेली, हे तिने का सांगितलं असत?  राणे आणि कदम, ' बरोबर '  राणे, ' मला तर त्याची बायको मीरा वर शंका आहे. ‘ कदम, ' या राणेचं तर आपलं काहीतरी वेगळच असत. तिचा बिचारीचा काय संबंध? ' राणे, ' अहो कदम, हि असली लफडी काही लपून राहत नाहीत. ' कदम, ' ते बरोबर आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ असा होत नाही कि ती कोणालाच दिसत नाही ' राणे, ' हा. पण इथे बोका आहे ना...' कदम, ' राणे, इथे एका माणसाचा जीव गेलाय आणि जोक कसले करताय? टॉपिक वर या ' राणे एक छोटी उडी मारतात, ' हे घ्या आलो टॉपिक वर ' यावर तिघे हि थोडं हसतात.  इ.जाधव, ' टाईमपास बस झाला आता. तर राणे तुम्हाला त्या मिरावर का शंका आहे? ' राणे, ' साहेब, त्या दिवशी मी एक पिक्चर बघितला त्यात ती बाई असच करते. ' कदम, ' राणे, हा पिक्चर नाहीये. ' राणे, ' माहितीये मला कदम, पण या पिक्चर वरूनच आजकालची पिढी सगळं शिकतीये. '

धागे - दोरे ( भाग ४)

राणे ५ मिनिटात परत येतात, ' साहेब, ती येते म्हटली ३० मिनिटात. ' ' छान. बरं, राणे, तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेलात तेव्हा काय - काय माहिती कळाली.' ' साहेब, त्या दिवशी त्यांच्या ऑफीस ची पिकनिक म्हणून हे सगळेच फार्महाऊस वर गेलेले. सगळे मिळून १८ जण होते. मी त्या बंगल्याच्या केअरटेकरशी बोललो, रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी चालू होती. समर त्या कंपनीत आधी काम करायचा आणि तिथेच असताना त्याचं आणि रुबीच प्रेमप्रकरण सुरु झालं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब हा बंगला खून झालेल्या बंगल्याच्या जवळच आहे.’ ' राणे, त्या दिवशी त्या पार्टीमध्ये कोण-कोण होत त्यांची लिस्ट बनवा आणि प्रत्येकाची चौकशी करा. मला जाणून घ्यायचय त्या दिवशी पार्टीमध्ये काही वेगळं घडलं का?, ती पार्टी कोणी अरेंज केली ? आणि ती जागा कोणी डिसाईड केली ? उद्याच सगळ्यांना इथे बोलावुन घ्या आणि प्रत्येकाची चौकशी करा. ' ‘ ठीक आहे साहेब.' थोड्याच वेळात रुबी आली. आकर्षक राहनिमाण, लाईट असा मेकअप, मोहक असे डोळे... पहिल्यांदाच असं कोणीतरी पोलीस ठाण्यात आली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. ह

धागे - दोरे (भाग ३)

पांडुरंग ने सांगितल्याप्रमाणे इ.जाधव ची मदत केली आणि त्यांनी ड्रग्स विकणाऱ्याला एक जाळं बनवून पकडलं. पण अजूनही समर मर्डर केस सॉल्व्ह झाली नव्हती.  विचार करत असताना अचानक इ.जाधवला ती चमकणारी वस्तू आठवते जी त्यांना गेटजवळ सापडते. ते लगेच राणेला आवाज देतात.  'बोला साहेब' 'मी तुम्हाला एव्हिडन्स बॅगमध्ये टाकून एक वस्तू दिली होती जी मला त्या बंगल्याजवळ सापडली होती. ती घेऊन या. ' 'हो. साहेब.' राणे जाऊन एव्हिडन्स बॅग घेऊन येतात. त्यात एक मोठा डायमंड असलेलं गोल्डचं कानातलं असत.  ते निरखून पाहिल्यानंतर त्यावर एक लोगो दिसतो तो एका मोठ्या ज्वेलर्स चा लोगो असतो. इ.जाधव ते कानातलं घेऊन हवालदाराला देतात.  ' सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये या कानातल्याचा फोटो पाठवा आणि इनामदार ज्वेलर्सच्या सगळ्या शाखांमध्ये जाऊन याची डिटेल्स काढा.’ तेवढयात कदम येतात आणि समरच्या मोबाईल ची कॉल डिटेल्स देतात. ' कदम मोबाईल ट्रॅक झाला का ?' इ.जाधव कॉल डिटेल्स निरखून पाहत ' नाही सर, आम्ही त्याच्या IMEI नंबर वरून पण ट्रॅक करायचा प्रयत्न केला, पण मोबाईल अजून चालूच केला गेला नाही.&

धागे - दोरे (भाग २)

इ.जाधव, ‘ राणे, आपण नंतर बोलू. मॅडम साठी चहा सांगा. माफ करा समजू शकतो तुमची परिस्थिती पण चौकशी करणं तेवढंच गरजेचं आहे. मला त्या दिवशी नेमक काय घडल ते सगळं सांगा.’ मीरा ने पाण्याचा एक घोट घेत सांगायला सुरुवात केली, ' आम्ही ठाण्याला राहतो. आमच्या दोघांचे आईवडील गावी असतात. १ वर्ष झाल आमच्या लग्नाला. समर आणि मी, मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहोत. रोजच आपलं तेच रूटीन, लवकर उठा ऑफिस ला जा आणि येऊन घरचं उरका. मला कंटाळा आलेला म्हणून मीच समर ला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मग समर ने मला या गेस्टहाऊस बद्दल सांगितल आणि आम्ही आलो इकडे २ दिवस रहायला. पांडुरंग ने आम्हाला पाणी दिलं. फ्रेश होऊन बसलो गप्पा मारत. मग पांडुरंग ने जेवण आणून दिलं. ते जेवलो आणि मग दमल्यामुळे लवकर झोपलो. रात्री तहान लागली म्हणून उठले. तर पाणी च नव्हतं म्हणून खाली किचन मध्ये जाऊन बॉटल भरून आणली आणि येऊन बघते तर समर रक्ताच्या थारोळ्यात होता. मग माझा आवाज ऐकुन पांडुरंग धावत आला आणि मग तुम्हाला कॉल करून बोलावून घेतल.’ मीरा हळूच डोळ्याच्या कडा पुसत होती. इ.जाधव, ' बरं, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कळवलत का ?

धागे - दोरे (भाग १)

रात्री २ च्या दरम्यान मीराला तहान लागते म्हणून ती उठते पण बाटलीतलं पाणी संपलेलं होत म्हणून ती बाटली घेऊन किचनमधून भरून घेऊन बेडरूममध्ये येते आणि समोरच दृश्य पाहून जोरात किंचाळते, तिला काय करायचं काहीच कळेना. तिचा नवरा समर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. ती जवळ जाऊन पाहते पण त्याचा श्वास बंद पडलेला असतो. स्वतःला सावरून ती पोलिसांना फोन करून कळवते. थोड्याच वेळात तिथे पोलीस येतात. तिथला केअर टेकर पांडुरंग पण तिथे हजर झालेला असतो. इन्स्पेक्टर जाधव त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तिथे हजर होतात. मीरा एका बाजूला रडत बसलेली असते. इ .जाधव, ‘ (बॉडीकडे वळून निरीक्षण करत) कदम बॉडी ताब्यात घ्या आणि पंचनाम्याला पाठवा. राणे बॉडी च्या आजूबाजूला काही पुरावे मिळत आहेत का बघा. (नंतर मिराकडे वळून) तुम्हीच कॉल केला होता का ?’ मीरा, ‘ हो.’ इ. जाधव, ‘ हे तुमचे कोण ?’ मीरा, ‘ मी मीरा. हा माझा नवरा समर ‘ (तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसत) इ.जाधव, ‘हे बघा तुम्ही स्वतःला सावरा.’ पुढे काही बोलणार तितक्यात, मीरा चक्कर येऊन खाली पडते. इ.जाधव, ‘ सावंत बाई यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा लवकर. मीराला घेऊ

घे भरारी...

वाईट विचारांना झुगारून, अंधश्रद्धेची मान मुरगळून, तोडून सगळे, मानवी पाश... विसरून सगळ्या, जगाची बंधने... पसरव तुझे पंख, हो मोकळी... स्वच्छंद अशा गगनात, घे भरारी....

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा

जीवन खुप सुंदर आहे

आज अचानक बातमी आली आणि धक्काच बसला. सुशांत सिंग राजपूत ने आपल्या मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केली. तसे या वर्षी बरेच धक्के आपण सहन केलेत. कितीतरी चांगल्या कलाकारांना गमावलं आपण यावर्षी. त्यातले काहीजण वृध्द होते, काही आजारी आणि काही मानसिकरीत्या आजारी. डिप्रेशन सध्या सगळ्यात मोठा आजार झालंय. होय, कोरोणा पेक्षा ही भयानक आजार. इतर आजारांमध्ये तुम्हाला आजाराची लक्षणं दिसतात, इतर लोक तुमची काळजी घेतात पण डिप्रेशन हा असा आजार आहे की त्यात बऱ्याचवेळा तुम्हालाच कळतं ही नाही, ना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना. खरतर आपल्याकडे या गोष्टीला तेवढस महत्वचं दिलं जात नाही. बरेच जण तर बोलायलाच घाबरतात कारण आपण जर बोललो तर लोक हसतील, नाहीतर आपल्याला थोडंसं सकारात्मक काहीतरी बोलुन ज्ञान द्यायचं काम करतील, यापुढे काही होणार नाही. डिप्रेशन हा सध्याच्या तरुण पिढीत वाढणारा सगळ्यात वाईट आजार झालाय. सोशल मीडियाच्या जगात १००-२०० मित्र असून सुद्धा ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं शेअर करू शकतो, जो आपल्याला समजून घेऊ शकतो असा एकही मित्र आपल्या भेटू नये? का आपण उघडपणे आपल्या भावना कोणासमोर व्यक्त

ठेच

सं ध्याकाळ ची वेळ, आई - बाबा बसून गप्पा मारत आहेत. दोघांच्या हातात मोबाईल. बाबा : अगं, तुला सांगायला विसरलो. त्या पवारांच्या मुलीच लग्न ठरलं. पुढच्या विकेण्डला आपल्याला जाव लागेल लग्नाला. आई : अरे वाह, चांगलं झालं. बाबा : काय चांगल झालं? माझ्या मते तो फारच गडबड करत आहे. आई : कसली गडबड? अरे आपल्या मानसी बरोबर ची आहे ती. दोघींनी इंजिनिअरींग केल सोबत आणि आता 3 वर्ष झाली जॉब करतेय. चांगली सेटल आहे आणि जर मुलगा पण वेल सेटल आणि मनासारखा असेल तर ...चांगलच. ( हातातला मोबाईल बाजूला ठेवत) बरं, मी काय म्हणते... बाबा : नको बोलुस ( मोबाईल कडे बघत) आई : अस काय रे करतोस, ऐकून तरी घे... बाबा : मला माहिती आहे की तु आता काय बोलणार आहेस. यावेळेस कोणी स्थळ सुचवलय ? आई : अरे, त्या जाधव आहेत ना त्यांचा भाचा आहे. वेल सेटल आहे आणि स्वभावाने पण फार चांगला आहे. बाबा : तुला त्याचा स्वभाव कसा माहिती ? आई : अरे, त्या जाधव बाई सांगत होत्या. त्या मला त्याचा फोटो वॉट्सप करणार आहेत. बाबा : अगं, हो हो... कीती घाई. आई: घाई नाही रे, त्यांनी मला सुचवलं म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता पासुन सुरुवात करू  तेव्हा

भाग्यरेषा.... भाग ३

शो भाला मात्र स्वतःचीच लाज वाटत होती. नक्की काय कमी पडली तिच्या प्रेमात की सुनिलने तिच्याशी असं वागावं. इकडे सुनिल मात्र दोन दिवसात घरी परतला. परशुरामचे डोळे शोभाला शोधत होते, पण सुनिल एकटाच होता. परशुराम उठून सुनिलला शोभाबद्दल विचारू लागला, “ सुनिल, शोभा कुठे आहे ?” सुनिल, “ती मुंबईत हरवली” परशुराम, “काय ? अशी- कशी हरवली? तु कुठे होतास ?” सुनिल , “मी तिच्या सोबतच होतो. तीच कुठे गेली काय माहीत, मला वाटतंय ती तिच्या यारसोबत पळून गेली.” परशुराम, “ तोंड सांभाळून बोल. शोभा तशी नाही.” सुनिल, “ मग कशी आहे ?, तुम्ही नका सांगू मला, वेडं बनवलं तिने आपल्या सगळ्यांना, सगळे दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली ती.” सुनिल जोरजोरात रडून परशुरामच्या गळ्यात पडतो. सुनिल, “अहो बाबा तुम्ही खूप साधे आहेत त्याचाच फायदा उचलला तिने. बरं झाली ती अवदसा गेली.” परशुराम, “सुनिल, तोंड बंद कर तुझं” सुनिल, “ तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा तिची जास्त काळजी आहे. मला एकदा तरी विचारलत मी कसा आहे?” परशुराम, “ मला विश्वास नाही बसते. शोभा असं नाही करू शकत." सुनिल, “असच झालय बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर” परशुराम डोक्याला हात ल

भाग्यरेषा... भाग २

शा मरावने सगळा प्लॅन सुनिल आणि कमळा ला सांगितला ते दोघेही खुश झाले. तिघांनी एकमेकांकडे हसत पाहिलं आणि सुनिल तिथून निघुन गेला. सुनिल घरी आल्यावर अनिल आणि परशुरामशी गप्पा मारत बसला. सगळे एकत्र जेवले. सगळं काही चांगलं होऊ लागलं होतं पण परशुरामच्या मनात एक खंत होती, सुनिल अजूनही शोभाशी बायकोसारख वागत नव्हता. शोभा मात्र सुनिलवर फार प्रेम करत होती. त्या घरासाठी फार काम करायची. दुसऱ्या दिवशी सुनिल परशुरामकडे आला आणि त्याने इच्छा प्रकट केली. सुनिल : मला माहितीये बाबा, तुम्हाला सगळ्यांना मी फार त्रास दिलाय, त्याहीपेक्षा शोभाला. तिला कधीच कुठलंच सुख दिल नाही मी. पण आता मला माझी चूक कळलीये. बाबा, माझी इच्छा आहे की मी तिला घेऊन मुंबईला फिरून यावं. परशुराम : (हसत) अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तुला हवं तिथे जा तिला घेऊन तिलाही बरं वाटेल, बिचारी दिवसभर राबते घरासाठी. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा हीच इच्छा राहिलीये. ते दोघेही बाहेरच्या पडवीत बसले होते आणि शोभा भिंतीपलीकडून सगळं ऐकत होती. ते ऐकून तिच्या आनंदाला सिमा उरली नाही, तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि हसत-हसत ती देव्हाऱ्याजवळ गेली आणि देवा

भाग्यरेषा ...भाग१

म हाराष्ट्रात थेरगाव म्हणून एक छोटंसं गाव होत. गावात ५०-६० घर असावीत. त्या गावात परशुराम पाटील नावाचे गृहस्थ होते, जे या गावचे सरपंच होते. ४५ च्या आसपास वय, किडकिडीत देहयष्टी, डोक्यावर बांधलेला फेटा, अंगात पांढरा सदरा आणि धोतर. गावातल्या काही अडी-अडचणी, समस्या समजुन घेऊन त्यावर योग्य आणि लोकहीतकारक सल्ला देऊन ते नेहमीच लोकांची मदत करायचे. कोणाची पैस्यांची गरज लक्षात घेऊन त्याची ही नड ते भागवत. एकंदर प्रेमळ, माणुसकीबाज असा हा माणुस. गावातले लोक त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा फार आदर करीत. तो म्हणेल तेच योग्य असा लोकांचा त्यावर पुर्ण विश्वास होता. परशुराम धन- दौलत, नोकर-चाकर सगळं असुनही त्यांना कौटुंबिक समाधान मात्र हवे तसे नव्हते. परशुरामचे आई-वडील गेले आणि घराची- शेतीची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. परशुरामचे लग्न झाले. त्यांची बायको सुमित्रा फार सुंदर आणि स्वभावाने चांगली होती. त्यांना एकूण दोन मुले झाली. त्यातील पहिला अनिल. त्याच्या जन्माने गावकरी ही फार खुश झाले. जसा- जसा अनिल मोठा झाला तसं त्याचं अपंगत्व सगळ्यांना कळालं, बरेच औषधोपचार केले, अंगारे-धुपारे केले पण काह